शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविली

By admin | Updated: December 14, 2015 02:37 IST

दुचाकीवरील चोरटट्यांचा प्रताप.

अकोला : मलकापूर परिसरातील कोठारी वाटिका येथून एक महिला स्वाध्यायमाला ध्यान के ंद्रामध्ये जात असताना या महिलेच्या गळय़ातील तब्बल ५२ ग्रॅम सोन्याची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने हिसकून पळ काढल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दर तिसर्‍या दिवशी अशा प्रकारच्या घटना घडत असताना पोलीस मात्र दुचाकीवरील चोरट्यांना शोधण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत.कोठारी वाटिका येथील रहिवासी जयश्री पाटील ही महिला तिच्या घरून कोठारी वाटिकेतच असलेल्या स्वाध्यायमाला ध्यान केंद्रात जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे ५२ ग्रॅमची सोनसाखळी किंमत अंदाजे एक लाख रुपये हिसकली. पाटील यांनी आरडा-ओरड केली मात्र, तोपर्यंंत चोरटा सोनसाखळी घेऊन पसार झाला. पोलीस दप्तरी या सोन्याची किंमत ५५ हजार रुपये असली तरी त्यांच्या ५२ ग्रॅम सोन्याची किंमत आजच्या भावानुसार सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती महिलेने दिली. शहरात मंगळसूत्र व दागिने हिसकणार्‍या टोळीने प्रचंड हैदोस घातला असून, दर दिवसाआड ही घटना घडत आहे. मात्र पोलिसांनी अद्या पही अशा घटनांचा तपास गांभीर्याने केला नसल्याचे दिसून येत आहे. आता विवाह सोहळय़ांना प्रारंभ झाला असून, अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा चोरट्यांवर नजर ठेवण्याची गरज आहे. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी खदान पोलीस ठाण्या त दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दा खल केला आहे.