शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय साधा, गटनेता निवडा!

By admin | Updated: March 13, 2015 01:35 IST

प्रदेशाध्यक्षांचा काँग्रेस नगरसेवकांना सल्ला

अकोला: मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी पक्षाचा अधिकृत गटनेता निवडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नगरसेवकांवर सोपवली. आपसात समन्वय साधून शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत गटनेता निवडण्याचा सल्ला गुरुवारी पार पडलेल्या टिळक भवनमधील बैठकीत दिला. महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक २0 मार्चपूर्वी पार पडेल. आजरोजी पक्षाच्या गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले. काँग्रेसच्या १८ नगरसेवकांपैकी चार ते पाच नगरसेवकांचा गटनेता दिलीप देशमुख यांच्या नावाला विरोध आहे. अशास्थितीत स्थायी समितीसाठी विभागीय आयुक्तांकडे गटनेत्यांचे नाव निश्‍चित करण्याची वेळ आल्यानंतरच काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला. गटनेता निवडीचा तिढा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दालनात सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले. गुरुवारी टिळक भवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत चव्हाण यांनी शहर अध्यक्ष मदन भरगड, गटनेता दिलीप देशमुख, साजीद खान यांच्यासोबत चर्चा केली असता, आपसात समन्वय साधून शुक्रवारी दुपारपर्यंत गटनेता निवड करण्याचे निर्देश दिले. तसे न झाल्यास स्वत: गटनेता निवडणार असल्याचे स्पष्ट केले