शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक प्रजातीच्या वृक्षांवर संक्रांत

By admin | Updated: December 2, 2015 03:01 IST

गुलमोहराचे वाढते प्रमाण चिंताजनक!

अकोला: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करताना निरुपयोगी झाडांच्या रो पांची लागवण केली जात आहे. यात गुलमोहरसारख्या विदेशी प्रजातीच्या झाडांचाही समावेश आहे. गुलमोहराचे वाढते प्रमाण स्थानिक हवामानासाठी चिंताजनक बाब असून, यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होण्याची भीतीदेखील पर्यावरणप्रेमी तथा वृक्षसंवर्धनासाठी काम करणार्‍या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. वातावरणानुसार त्या-त्या परिसरात निसर्गाने झाडांच्या विशिष्ट प्रजातींची निर्मिती केली आहे. अशावेळी स्थानिक प्रजातींची जागा इतर वृक्षांनी व्यापली जाते तेव्हा त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होताना दिसतात. वड, पिंपळ, उंबर, चिंच, निंब या वर्‍हाडातील वृक्षांच्या मूळ प्रजाती आहेत. त्यांच्या जागेवर आता गुलमोहरासारख्या मुळात कमकुवत वृक्षांची लागवड केली जात असून, त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणांवर वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रजातींवर संक्रात येण्याची भीती ११ वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणार्‍या स्वावलंबी इको क्लबचे समन्वयक हरीश शर्मा यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर हा मुळात मादागास्कर बेटावरील वृक्ष आहे. दिसायला मोहक असलेल्या त्याच्या फुलांना सुगंध नाही. सावलीसाठी कामाचे नसल्याने पक्षीही या झाडाकडे फिरकत नाहीत. जैवविविधता जपण्यात या झाडाचे कोणतेही योगदान नाही. तरीही या वृक्षाची लागवड करण्याकडेच अधिक कल दिसून येतो. त्याऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, निंब या स्थानिक प्रजातींची लागवड अधिक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.