शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारी पदार्थ खाताहात, सावधान..!

By admin | Updated: September 4, 2015 23:02 IST

युवतीच्या नाकाद्वारे काढला २५ सें.मी. लांबीचा कृमी.

अकोला : अकोल्यातील एका युवतीच्या शरीरातील तब्बल २५ सें.मी. लांबीचा कृमी नळीच्या साहाय्याने नाकाद्वारे काढण्यात आला. २९ ऑगस्ट रोजीची ही घटना असून, कृमीची उत्पत्ती अर्धवट शिजलेल्या मांसाहारी पदार्थाच्या सेवनामुळे झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अकोल्यातील जुने शहरातील एका १७ वर्षीय युवतीने विष प्राशन केल्याने तिला शनिवार, २९ ऑगस्ट रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विष प्राशन केल्याने तिची प्रकृती चिंताजनक होऊ लागली. युवतीचे प्राण वाचविण्यासाठी तिच्या शरीरात नाकाद्वारे नळी टाकण्यात आली. नळीद्वारे विष बाहेर काढत असताना डॉ. प्रशांत वानखडे यांना नळीमध्ये कृमी आढळून आला. हा कृमी २५ सेंटिमीटर लांबीचा असून, युवतीने विष प्राषण केल्यावरही तो जिवंत असल्याने डॉक्टरांनी आश्‍चर्य व्यक्त केले. डॉक्टरांना या कृमीबाबत विचारले असता, अशा प्रकारच्या कृमीची उत्पत्ती ही मुख्यत्वे अर्धवट शिजलेल्या मांसाहारी पदार्थाच्या सेवनामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता त्या युवतीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.*कृमीची लक्षणेअशा प्रकारचे कृमी शरीरात असल्यास भूक मंदावणे, डायरिया, वजन कमी होणे, थकवा येणे आदीलक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे फायदेशीर ठरते. *कृमी धोकादायकअर्धवट शिजवलेले मांसाहारी पदार्थ किंवा अस्वच्छ ठिकाणचे खाद्यपदार्थ सेवनामुळे मानवी शरीरात कृमींची निर्मिती होते. ऐरव्ही अशा प्रकारचे कृमी गुदद्वारे निघतात; परंतु या कृमींचा शरीरात विकास होत गेल्यास त्यांचा आकार वाढू लागलो. कृमीचा आकार जसजसा वाढत जातो तसतसा शरीरासाठी तो धोकादायक ठरू लागतो.