शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित समित्या गठित करा!

By admin | Updated: March 20, 2017 02:41 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश; अधिका-यांची घेतली बैठक

अकोला, दि. १९- शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रलंबित जिल्हास्तरीय समित्या तातडीने गठित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.विविध योजना आणि विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या विभागांतर्गत शासकीय अधिकारी आणि अशासकीय पदाधिकारी-सदस्यांच्या जिल्हास्तरीय समित्यांचे गठन झाले की नाही, प्रलंबित असलेल्या समित्या गठित का झाल्या नाहीत आणि समित्या गठित करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला; तसेच विभागनिहाय जिल्हास्तरीय विविध समित्यांच्या रचनांची माहिती सादर करून, प्रलंबित असलेल्या जिल्हास्तरीय समित्या तातडीने गठित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह समाजकल्याण, कामगार कल्याण, वन विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.समित्यांचे गठन प्रलंबित का राहिले?जिल्ह्यात काही विभागांतर्गत अद्याप जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या नाहीत. त्यानुषंगाने समित्यांचे गठन करण्याची प्रक्रिया प्रलंबित का राहिली, यासंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना यावेळी विचारणा केली. प्रलंबित असलेल्या समित्यांचे गठन तातडीने करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले.