शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील कलहावर काँग्रेसचे बोट

By admin | Updated: May 23, 2017 01:00 IST

अकोला: भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी बोट ठेवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी बोट ठेवले आहे. खासदार आणि पालकमंत्र्यांमधील वादाचा शहरातील विकास कामांवर परिणाम व्हायला नको, अशी अपेक्षा साजिद खान यांनी महापौर विजय अग्रवाल यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे. भाजपमध्ये मागील अनेक दिवसांपासून गटातटाचे राजकारण रंगले आहे. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर आणि पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील गटातटाचे राजकारण सर्वश्रुत आहे. प्रशासकीय यंत्रणांनी आयोजित के लेल्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटातील धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. मध्यंतरी शहरात एलईडी पथदिव्यांच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपमध्ये महाभारत छेडल्या गेल्याचे अकोलेकरांनी पाहिले. एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणाऱ्या आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख नसल्यामुळे मोठा गहजब झाला होता. हा कार्यक्रम प्रशासकीय असल्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधींचा रोष महापालिका प्रशासनासह महापौरांवरदेखील होता. मागील काही दिवसांपासून राजकीय मुद्यांच्या शोधात असलेल्या काँग्रेसने भाजपमधील अंतर्गत कलहावर बोट ठेवत शहर विकासाच्या आड वादावादी येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी महापौर विजय अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात पक्षातील अंतर्गत वादाचा शहर विकासावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा वजा सूचना केली आहे. विरोधी पक्षनेता साजिद खान यांचे पत्र कार्यालयात आल्याची माहिती आहे. भाजपमधील अंतर्गत कलहाची काळजी करण्यापेक्षा काँग्रेसने स्वपक्षाच्या वर्तमान स्थितीकडे लक्ष दिल्यास बरे होईल. शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असून, विकास कामे होतीलच, त्याची काळजी काँग्रेसने करण्याचे कारण नाही. - विजय अग्रवाल, महापौर