शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस- राष्ट्रवादीची पुन्हा सरशी!

By admin | Updated: June 30, 2016 00:05 IST

वाशिम जि.प. अध्यक्षपदी हर्षदा देशमुख; उपाध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे!

वाशिम : जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने दोन्ही पदांसाठी बुधवार, २९ जून रोजी निवडणूक पार पडली. त्यात पुन्हा एकवेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करित मिनीमंत्रालयात हे दोन पक्षच वरचढ असल्याचे दाखवून दिले. बहुतांशी एकतर्फी झालेल्या या निवडणूकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख; तर उपाध्यक्षपदी पुन्हा एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे आरूढ झाले. जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सत्तेची सूत्र आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राकाँच्या स्थानिक नेत्यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत १७ जागा घेऊन काँग्रेस हा जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन, असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. यंदा मात्र अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने निवडणूकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसकडे स्वत:चे १७ आणि दोन अपक्ष, असे १९ संख्याबळ होते; तर मित्रपक्ष असलेल्या राकाँकडे आठ सदस्य असल्याने काँग्रेस-राकाँ-अपक्ष आघाडीने जिल्हा परिषदेत पुन्हा एकवेळ आपले निर्भेळ वर्चस्व सिद्ध केले. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख यांच्याविरोधात शिवसेनेच्या मनिषा सानप यांनी अर्ज दाखल केला. त्यात मनिषा सानप यांना २१ मते मिळाली; तर हर्षदा देशमुख यांनी ३0 मते घेत विजयाला गवसणी घातली. दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांच्याविरोधात भाजपाच्या शंकर बोरकर यांनी उमेदवारी दाखल केली. त्यात चंद्रकांत ठाकरे यांनी तब्बल ३२ मते घेत उपाध्यक्षपद काबीज केले; तर शंकर बोरकर यांना केवळ १९ मते मिळाली.