शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालकल्याणच्या सभेचाही गोंधळ

By admin | Updated: July 4, 2017 02:43 IST

अकोला : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाकडून समितीच्या सभेच्या नोटिसाही सदस्यांना मिळाल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाकडून समितीच्या सभेच्या नोटिसाही सदस्यांना मिळाल्या नाहीत. तरीही सभेला उपस्थित झालेल्या सदस्यांना गेल्या सभेतील कामकाजाचे इतिवृत्तही देण्यात आले नाही, या प्रकारामुळे संतप्त सदस्यांनी महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत सभा तहकूब केली. ती सभा ७ जुलै रोजी होणार आहे. महिला व बालकल्याण समिती सभेच्या नोटिसा संबंधित सदस्यांना मिळत नसल्याची तक्रार खुद्द सभापती देवकाबाई दिनकरराव पातोंड यांनी २३ जून रोजीच महिला व बालकल्याण अधिकारी सोनकुसरे यांच्याकडे दिली आहे. तरीही ३ जुलै रोजीच्या सभेच्या नोटिसा सदस्यांना पोचल्याच नाहीत. सभापतींचे स्वीय सहायक पुंडकर यांनी केलेल्या दूरध्वनीनुसार सदस्य उपस्थित झाले. त्यामुळे सदस्य आणखीच संतप्त झाले. सभेची नोटिसही दिली जात नाही, इतिवृत्तही मिळत नाही, तर सभेला कशाला यायचे, असा संतप्त सवाल त्यांनी सभापतींसह सोनकुसरे यांना केला. हा प्रकार सातत्याने घडत असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. काही कामकाज होत असेल, तरच सदस्यांना किंमत आहे; अन्यथा बोलावूच नका, असा पवित्राही सदस्यांनी घेतला. त्यामुळे महिला व बालकल्याण अधिकारी सोनकुसरे चांगलेच अडचणीत आले. सभापती पातोंड यांनी बाजू सावरत तहकूब सभा ७ जुलै रोजी घेण्याचे सांगितले. सर्वसाधारण सभेलाही सोनकुसरे यांची दांडीजिल्हा परिषदेच्या १४ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेला महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांनी दांडी मारली होती. त्यावेळी प्रशासकीय शिस्त म्हणून त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साधी विचारणाही न केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे ऐनवेळी सभेत सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी सोनकुसरे यांच्यावर कारवाईसाठी नोटिस बजावण्याचे निर्देश दिले. त्याबाबतची माहिती मोबाइलद्वारे देण्याची तसदीही त्यांनी घेतलेली नाही. ते स्पष्टीकरण ग्राह्य धरण्याबाबत आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात, यावरच कारवाई अवलंबून आहे.