शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

क्राफ्ट डीएडच्या नूतनीकरण मुदतवाढीस विरोध

By admin | Updated: August 15, 2014 01:23 IST

हजारो विद्यार्थी राहणार प्रशिक्षणापासून वंचित

विवेक चांदूरकर /अकोलाखासगी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ देण्याच्या मागणीला महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाकडून बगल देण्यात येत असल्यामुळे हजारो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहणार असून, शेकडो प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत राज्यात शेकडो प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या. याअंतर्गत नाममात्र शुल्कावर विद्यार्थ्यांना फिडर, वेल्डर, वायरमन, हस्तकला व कार्यानुभव प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संगणक, इलेक्ट्रॉनिकचे प्रशिक्षण, असे दोन व एक वर्षाचे अभ्यासक्रम शिकविल्या जातात. ग्रामीण भागात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना खासगी प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन व्यवसायाची संधी शोधावी लागते. या संस्थांना दरवर्षी ५५0 रुपयांचे शुल्क भरून नूतनीकरण करावे लागते. यावर्षी नूतनीकरणाची अंतिम मुदत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा होती. परंतु, यावर्षी अनेक खासगी संस्था ठरवून दिलेल्या तारखेच्या आत व्यवसाय प्रशिक्षणाचे नूतनीकरण करू शकल्या नाहीत. त्यानंतर या संस्थांनी नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्याची मागणी मंडळाकडे केली. मात्र, मंडळाने विरोध केला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर या प्रशिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी दोन वेळा नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्यात आली होती. यावर्षी मात्र मुदत वाढविण्यास मंडळाकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. या संस्थांना नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संस्थांकडून केली जात आहे. काही संघटना व राजकीय पक्षांनी याकरिता आंदोलनेही केली. तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी नूतनीकरणाला मुदतवाढ देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे प्रवेशाची वेळ निघून जाणार आहे.