शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींकडून देशीकट्टा व जिवंत काडतूस जप्त

By admin | Updated: July 1, 2016 02:09 IST

शर्मा गोळीबार प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

अकोला : औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक दोन मध्ये रुंगटा टायर्ससमोर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडात वापरलेला देशीकट्टा व जिवंत काडतूस गुरुवारी जप्त केले. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत ७ जुलैपर्यंत वाढ केली आहे.शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना रुंगटा टायर्स समोरच्या पहिल्याच वळणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या कानाजवळ व मस्तकावर देशी कट्टय़ाने गोळी झाडून हत्या केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवणी येथील रहिवासी बबलू ऊर्फ रामेश्‍वर सनोदिया (२२) व गोलू ऊर्फ ईश्‍वर सनोदिया या दोन आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींनी सुपारी घेऊन हत्या केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आणखी एका आरोपीचा समावेश असल्याच्या संशयावरून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना त्यांची कसून चौकशी केली असता, आरोपींकडून हत्येसाठी वापरलेला देशीकट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींना गुरुवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची आता कसून चौकशी करण्यात येणार असून, त्यांच्या चौकशीमध्ये गुन्हय़ासंबंधी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.