शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी, सूचना, अपेक्षा अन् मदतीची आशा!

By admin | Updated: November 21, 2015 01:49 IST

केंद्रीय पथकाचा बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ दौरा.

बुलडाणा : दूष्काळाचे चटके सहन करीत असलेल्या बुलडाण्याला सर्वप्रथम नजर आणेवारीने हुलकावणी दिली, सुधारित आणेवारीत दूष्काळाचे चित्र स्पष्ट झाल्याने शेतकर्‍यांना मदत मिळेल अशी आशा निर्माण झाली. त्याच आशेतून शुक्रवारी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकावर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शुक्रवारी सुचना, अपेक्षा, तक्रारींचा पाऊस पडला. शेतकर्‍यांनी आपल्या मनातील शल्य यानिमित्ताने केंद्रीय पथकासमोर मांडल्याने या पथकाच्या अहवालानंतर ठोस मदत मिळेल अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे. दूष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाले. सकाळी साडे दहा वाजतापासून त्यांनी सिंदखेडराजा येथून शेती व पिकांची पाहणी करीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. दुष्काळाची प्रातिनिधीक स्वरूपात पाहणी झाली. आता या पथकाच्या अहवालानंतर केंद्राच्या मदतीचे निकष ठरणार असल्याने शेतकर्‍यांना मदतीची प्रतिक्षा लागून आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता केंद्राची चार पथके राज्यात आली असून त्यातील एका पथकाने शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्याची पाहणी केली. या पथकाचे प्रमुख के नारायण रेड्डी यांच्यासह जगदीश कुमार, अशोक आत्राम यांचा समावेश होता. या पथकाने शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेती व पिकांची पाहणी करून, संकटाचा सामना करा, असा सल्लाही त्यांनी शेतकर्‍यांना दिला. धीर धरा, आत्महत्या हा मार्ग नाही! मोहेगाव येथील महिलांनी पाहणी पथकातील प्रमुख के. नारायण रेड्डी यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या.पेरणीसाठी बँकांकडून व सावकाराकडून घेतलेले कर्ज फिटत नाही. मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे. घरातील कर्ते पुरूष आत्महत्येसारखा मार्ग निवडत आहेत. मागील वर्षीच्या दुष्काळाची मदतही मिळाली नाही. बँकाचे हप्ते थकले आहेत. अशावेळी कसं जगावं, अशी कैफीयत या महिलांनी मांडली. रेड्डी यांनी महिलांची ही व्यथा गांभीर्याने ऐकून घेतली. हे नैसर्गीक संकट आहे. या संकटापुढे कोणाचेही काही चालत नाही. आलेल्या संकटांना धैर्याने तोंड द्या, आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. आम्ही तुमच्या भावना सरकारला कळवू. डगमगून जावू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा धीर पथकातील अधिकार्‍यांनी दिला.