शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याची शेतक-यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: November 30, 2014 22:29 IST

अमरावती विभागात ८६३ तक्रारींचा निपटारा.

संतोष येलकर/अकोलाखरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत अमरावती विभागातील शेतकर्‍यांकडून करण्यात आलेल्या १ हजार ५११ तक्रारींपैकी ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या; मात्र बर्‍याच शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यासंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडे शेतकर्‍यांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती कृषी विभागाच्या प्रत्येक विभाग व जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. प्राप्त तक्रारींचा निपटारा करून, नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकर्‍यांना, त्यांनी घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची रक्कम परत करण्याचे आदेश कृषी विभागामार्फत संबंधित बियाणे कंपन्यांना देण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरीय चौकशी समिती अहवालाच्या आधारे शेतकर्‍यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात आल्या. त्यापैकी ८६३ तक्रारींचा संबंधित बियाणे कंपन्यांकडून आतापर्यंत निपटारा करण्यात आला असून, शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली.अमरावती विभागात १ हजार ५११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी आतापर्यंत ८६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, संबंधित शेतकर्‍यांना ८१ लाख ५८ हजार रुपयांची नुकसानभरपाई बियाणे कंपन्यांकडून देण्यात आली. उर्वरित तक्रारींचा निपटारा तातडीने करून, शेतकर्‍यांना बियाण्याची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश बियाणे कंपन्यांना देण्यात आले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.