शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त म्हणतात, हा तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न!

By admin | Updated: October 8, 2015 01:43 IST

अधिका-यांनीच शोधून काढले घरकुलच्या लाभार्थींना.

अकोला: महापालिकेत कार्यरत तीन कर्मचारी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेत असल्याचा छडा खुद्द संबंधित अधिकार्‍यांनीच लावला. यामध्ये एका सेवानवृत्त कर्मचार्‍याचादेखील समावेश आहे. या कर्मचार्‍यांच्या फाइल नामंजूर करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना आठ दिवसांपूर्वीच दिले होते. याप्रकरणी नाहक दिशाभूल केली जात असल्याचे बुधवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी स्पष्ट केले. महापालिकेमार्फत दारिद्रय़रेषेखालील नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थींसाठी रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत हक्काचे घर बांधून दिले जात आहे. बांधकाम विभागाला संबंधित लाभार्थींची यादी सुवर्ण जयंती नगरोत्थान विभागाकडून प्राप्त होते. अर्थातच, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असल्याशिवाय सुवर्ण जयंती विभागाकडून यादी पाठवली जात नाही. बांधकाम विभागाकडून संबंधित फाइलची शहानिशा केल्यानंतर वित्त विभागाकडे पाठविल्या जाते. रमाई घरकुलच्या पात्र लाभार्थींंमध्ये मनपात कार्यरत तीन तर एका सेवानवृत्त अशा चार कर्मचार्‍यांचा समावेश असल्याची बाब लेखा विभागातील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आली. हा प्रकार बांधकाम विभागाच्या समोर येताच संबंधित प्रकरण तत्काळ आयुक्त अजय लहाने यांच्या समक्ष ठेवण्यात आले. त्यावर फाइल नामंजूर करण्याचे आदेश आयुक्त लहाने यांनी आठ दिवसांपूर्वीच संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. अशा लाभार्थींना मनपा अधिकार्‍यांनीच हुडकून काढले असताना या प्रकरणाचा नाहक बाऊ करून प्रशासनाप्रती संभ्रम निर्माण केला जात असल्याचा मुद्दा प्रशासनाने उपस्थित केला.