शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त म्हणाल्या, कामे नियमानुसारच; बैठक टाय टाय फिस्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्केपेक्षा हाेणे अपेक्षित नसताना प्रशासनाने विविध विभागात खाेगीरभरती केलेल्या अनावश्यक कर्मचाऱ्यांमुळे हा खर्च ६५ टक्के ...

महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्केपेक्षा हाेणे अपेक्षित नसताना प्रशासनाने विविध विभागात खाेगीरभरती केलेल्या अनावश्यक कर्मचाऱ्यांमुळे हा खर्च ६५ टक्के झाला आहे. मनपाच्या विविध विभागात तसेच प्रभागातील पथदिवे, साफसफाईच्या सुविधेसाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याची ओरड करायची, अन् त्या माध्यमातून मर्जीतल्या अथवा नातेवाईकांना मानसेवी किंवा कंत्राटी तत्त्वावर महापालिकेत नियुक्त करण्याचा फंडा अनेक वर्षांपासून अविरत सुरु आहे. ही बाब मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या लक्षात येताच त्यांनी अनावश्यक व कामचुकार कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा सपाटा लावला आहे. आजवर त्यांनी अशा ३६ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून आणखी अनेकांचा नंबर लागणार आहे. आयुक्तांची ही भूमिका पदाधिकाऱ्यांसाठी अडचणीची ठरू लागली आहे़ त्यामुळे दलितवस्ती सुधार याेजना, नगराेत्थान याेजनेसह इतरही प्रलंबित मुद्यांच्या आडून आयुक्तांवर दबावतंत्र निर्माण करण्याच्या उद्देशापाेटी सत्ताधारी भाजपने शुक्रवारी आढावा बैठकीचे आयाेजन केले हाेते. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या अनेक मुद्यांवर आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, सभापती संजय बडोणे, सभागृह नेत्‍या योगिता पावसाळे, विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, गटनेता राहुल देशमुख, राजेश मिश्रा, नगरसेवक मो.मुस्‍तफा आदी उपस्थित हाेते.

त्याच समस्या, तेच निर्देश!

शहरात अमृत अभियान अंतर्गत प्रलंबित जलवाहिनीची कामे निकाली काढणे, पंतप्रधान आवास याेजनेतील घरकुलांना अनुदानाचे हप्ते वितरित करणे, गुंठेवारीमधील घरकुलांचा प्रश्न निकाली काढणे,

दलित वस्ती, नगराेत्थान याेजनेंतर्गत विकास कामांना सुरुवात करणे आदी मुद्दे निकाली काढण्यावर चर्चा करण्यात आली.

विराेधकांनी साधली चूप्पी

मनपा आयुक्तांच्या काही राेखठाेक निर्णयामुळे सत्तापक्षाची काेंडी झाली आहे. ही बाब ध्यानात घेता आढावा बैठकीत विराेधी पक्षनेता साजीद खान, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी चूप्पी साधत अप्रत्यक्षपणे प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे दिसून आले.