अकोला - जिल्हय़ातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) एकूण १३ इच्छुकांच्या रविवारी नागपूर येथे मुलाखती घेण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रवी भवनात सामूहिक मुलाखती घेतल्या. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता तीन ते चार दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अकोल्यात येवून गेले. नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांशीही चर्चा केली. दरम्यान रविवारी नागूपर येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी एकाही इच्छुकाने मुलाखत दिली नाही. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी तीन इच्छुकांचा समावेश आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी दोन उमेदवाराने मुलाखत दिली. बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी तीन जणांनी मुलाखत दिली असून, यामध्ये गत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराचाही समावेश आहे. यासोबतच आकोट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या पाच पदाधिकार्यांनी मुलाखती दिल्या. रविवारी राज ठाकरे यांनी मुलाखती घेतल्यानंतर जिल्हय़ातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या पदाधिकार्यांनी उमेदवारी पदरात पाडण्यासाठी ह्यफिल्डिंगह्ण लावण्यास सुरुवात केली आहे. मुलाखत देणार्यांमध्ये आजी-माजी पदाधिकार्यांचाही समावेश आहे.
मनसे प्रमुखांनी घेतल्या सामूहिक मुलाखती
By admin | Updated: August 25, 2014 02:58 IST