शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी साधणार मुख्यमंत्री संवाद!

By admin | Updated: June 21, 2016 23:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सोयगावच्या शाळेची निवड; मुख्यमंत्री व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारेचर्चा करणार.

बुलडाणा : २७ जूनपासून राज्यात नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असून, राज्यभर प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवानिमित्त खुद्द मुख्यमंत्री राज्यातील पाच शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सोयगाव येथील शाळेची निवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ या शैक्षणिक वर्षात विदर्भातील शाळा २७ जून रोजी सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांसोबत २७ जून रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. या व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी राज्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमधील पाच विद्यार्थी यामध्ये तीन मुले व दोन मुली त्यांचे प्रत्येकी एक पालक, शाळेतील सर्व शिक्षक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राचार्य डाएट, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहेन. जिल्हाधिकारी कार्यालयातून हा संवाद होईल. याकरिता शाळांना शाळेची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सादर करणारा दोन मिनिटांचा व्हीडीओ व बॅनर तयार करावा लागणार आहे.

या पाच शाळांची झाली निवड !व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी नागपूर जिल्ह्यातील विवेकानंद नगरमधील मनपा हिंदी उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली जिल्ह्यातील जि. प. शाळा बेजूर ता. गोरेगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील जिल्हा परिषद शाळा, बुलडाणा जिल्हय़ातील सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळा,अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमी येथील जिल्हा परिषद शाळा तसेच चिखलदरा तालुक्यातीलच मोझरी येथील शाळेचा समावेश आहे.