शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल लाइन ठाणेदाराची उचलबांगडी

By admin | Updated: December 1, 2014 00:29 IST

पोलीस अधीक्षकांचा फोन न उचलणे भोवले.

अकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची पोलीस अधीक्षकांनी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केलेला फोन न उचलल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची पोलीस वतरुळात चर्चा आहे. ठाणेदार यांच्या जागेचा प्रभार बाश्रीटाकळीचे ठाणेदार डी. डी. ढाकणे यांच्याकडे सोपविण्यात आला. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार हे काही दिवसांसाठी सुटीवर गेले होते. सुटीदरम्यान त्यांना पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला; परंतु सावकार यांनी हा फोन न उचलल्यामुळे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी तडकाफडकी निर्णय घेत, त्यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार सावकार हे सुटीवर असल्याने त्यांच्याकडील प्रभार हा बाश्रीटाकळीचे पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्याकडे सोपविला आहे. ढाकणे हे दोन ते तीन महिन्यांपूर्वीच बाश्रीटाकळी येथे ठाणेदारपदी रुजू झाले होते. सावकार यांच्या बाबतीत पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे पोलीस खात्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांचा फोन न उचलल्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याची पोलीस खात्यात जोरदार चर्चा रंगली आहे; परंतु सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी काहीच बोलायला तयार नाहीत आणि याबाबत आपल्या कानावर हात असल्याचेही काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले.