शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शहर घाणीच्या विळख्यात; सेनेचे आयुक्तांकडे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

शहरात सणासुदीच्या दिवसांमुळे गर्दीने बाजारपेठेत फुलला आहे. गणेशाेत्सवामुळे सर्वांची लगबग सुरू आहे. शुक्रवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून रविवारी ...

शहरात सणासुदीच्या दिवसांमुळे गर्दीने बाजारपेठेत फुलला आहे. गणेशाेत्सवामुळे सर्वांची लगबग सुरू आहे. शुक्रवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून रविवारी ज्येष्ठागाैरींचे आगमन हाेणार आहे. एकूणच, अकाेलेकर पावित्र्य व मांगल्याची अनुभूती देणाऱ्या सणासुदीच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर घाण व अस्वच्छता पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुर्गंधीमुळे बाजारात ग्राहकांना नाकाला रुमाल बांधून विविध साहित्याची खरेदी करावी लागत आहे. पावसाची रिपरिप सुरूच असल्याने साथीचे आजार बळावले असून अकाेलेकर तापाने फणफणत असल्याची परिस्थिती आहे. अस्वच्छतेची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याची बाब शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आयुक्त निमा अराेरा यांच्या निदर्शनास आणून दिली. सणासुदीचे दिवस पाहता यावर तातडीने उपाय करण्याची मागणी सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चाेपडे, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले यांनी आयुक्त अराेरा यांच्याकडे लावून धरली.

साफसफाइवर प्रभावी ताेडगा काढू!

मनपाने कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिलेले ट्रॅक्टर अपुरे आहेत. अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी कर्तव्याकडे पाठ फिरवल्याची बाब मिश्रा यांनी नमूद केली. त्यावर एक-दाेन दिवसांतच साफसफाईच्या संदर्भात प्रभावी ताेडगा काढणार असल्याचे निमा अराेरा यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अहवाल तपासणार

हरिहरपेठ येथील लसीकरण केंद्रात लस देताना चूक करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह परिचारिका व आशा सेविकेच्या निलंबनाचा मुद्दा राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. यासंदर्भात आयुक्तांनी वैद्यकीय आराेग्य अधिकारी डाॅ. अस्मिता पाठक यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.