शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात होणार एलईडीचा झगमगाट!

By admin | Updated: June 13, 2016 01:52 IST

एलईडीसाठी कंपन्या सरसावल्या; मनपाकडे प्रस्ताव

अकोला: शहरातील मुख्य रस्त्यांवर एलईडीच्या प्रकाशमान पथदिव्यांमुळे झगमगाट होण्याचे दिवस आता दूर नाहीत. महापालिका प्रशासनाला एलईडीसाठी १0 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडे काही शासकीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावावर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सकारात्मक संकेत दिल्याची माहिती आहे. महापालिका प्रशासनाने वीज बचत करण्याच्या उद्देशातून शहरातील मुख्य रस्त्यांवर सीएफएल लाइट लावले. २00६ पूर्वी शहरात पिवळ्य़ा सोडियम पथदिव्यांचा वापर होत असे. अत्यंत प्रकाशमान असलेल्या सोडियम लाइटमुळे विजेचा जास्त वापर होऊन त्याचे देयक प्रशासनाला द्यावे लागत होते. यावर उपाय म्हणून सीएफएल लाइटचा पर्याय समोर आला. मात्र, सीएफएलच्या पथदिव्यांमुळे लख्ख प्रक ाश मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एका पथदिव्यात चार नळ्य़ा लावल्या जातात. यापैकी बहुतांश वेळा दोन किंवा तीन नळ्य़ा बंद राहत असल्याने अकोलेकरांना रस्त्यांवर अंधुक उजेडाचा सामना करावा लागत आहे. सायंकाळ झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचा झगमगाट होणे अपेक्षित असताना अंधुक उजेड पडतो. या सर्व बाबी लक्षात घेता, आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्य रस्त्यांवर एलईडी लावण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. आ. शर्मा यांच्या प्रस्तावानुसार शासनाने १0 कोटी रुपये निधी मंजूर केला. एलईडी लाइटसाठी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाल्यामुळे भविष्यात मुख्य रस्त्यांवर लख्ख पथदिव्यांचा झगमगाट पाहावयास मिळणार, हे निश्‍चित झाले. एलईडी लाइट बसवण्यासाठी बाजारात नामवंत असणार्‍या अनेक कंपन्या तयार आहेत. अशातच काही शासन मान्यता असलेल्या कंपन्यांनी मनपाकडे एलईडीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.