शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँग्रेस नगरसेवकावर प्राणघातक हल्ला!

By admin | Updated: December 8, 2015 02:21 IST

नगरसेविकेचा पती व सहकार्‍यांकडून जुन्या वादातून हल्ला; अब्दुल जब्बार गंभीर जखमी.

अकोला: काँग्रसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यावर जुन्या वादातून मब्बा पहिलवान व त्यांच्या आठ ते दहा सहकार्‍यांनी हल्ला चढविला. लोखंडी पाइप व खुच्र्यांंनी मारहाण केल्याने अब्दुल जब्बार हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरापर्यंंत मब्बा पहिलवान यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील प्रभाग क्रमांक १५ अ मधील काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार अब्दुल रहमान यांच्या तक्रारीनुसार, काँग्रेसच्या नगरसेविका शाहीन अंजुम यांचे पती महबूब खान ऊर्फ मब्बा पहिलवान यांच्यात गत काही महिन्यांपासून वॉर्डांंतील कामांच्या विषयांवरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ल्यात झाले. यापूर्वीदेखील नगरसेवक अब्दुल जब्बार व मब्बा पहिलवान यांच्यात वाद झाले हो ते; परंतु महापालिकेतील काही पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून हे वाद मिटविले होते. गत काही दिवसांपासून दोघांमधील वादाला पुन्हा तोंड फुटले. सोमवारी दुपारी अब्दुल जब्बार राणी सतिधाम मंदिरासमोरून जात अस ताना, मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्‍यांनी अडविले आणि अब्दुल जब्बार यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळही केली. यादरम्यान त्यांच्यात झटापट झाली. अब्दुल जब्बार यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत थेट महापालिका कार्यालय गाठले आणि विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्या कक्षात जाऊन बसले. या ठिकाणी मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्‍यांनी येऊन पुन्हा वाद घातला. साजिद खान पठाण व सहकार्‍यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाद विकोपाला गेल्याने मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्‍यांनी सोबत आणलेल्या लोखंडी पाइपने आणि कक्षातील खुच्र्या उचलून जब्बार यांच्या हल्ला चढविला. यात जब्बार यांच्या डोक्याला, खांद्याला जबर मार लागला. साजिद खान व त्यांच्या सहकार्‍यांनी अब्दुल जब्बार यांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अब्दुल जब्बार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मब्बा पहिलवान यांच्यासह अन्वर खान बिलावर खान, राशीद खान अन्वर खान आणि मब्बाचा मुलगा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२६,५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला.