शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

थंडी ओसरली, हरभरा संकटात विविध किडींचा हल्ला

By admin | Updated: December 12, 2014 01:26 IST

खरीप हंगामातील पिके शेतक-यांच्या हातून गेलीत.

अकोला : यावर्षी खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली असून, आता रब्बी हंगामावरही संकट आले आहे. जिल्ह्यातील हरभरा हे रब्बी हंगामात महत्त्वाचे पीक आहे. जिल्‘ात यावर्षी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी करण्यात आली; मात्र थंडीच नसल्यामुळे दव पडत नसून, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.यावर्षी पावसाळ्यात दोन महिने उशिरा पाऊस झाला. त्यामुळे उडीद व मुगाच्या पिकांची पेरणी करता आली नाही. त्यातच अल्प पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओल नव्हती. याचा परिणाम रब्बी पिकांवर पडला. शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी केली. थंडी पडली तर सकाळी वातावरणात दव तयार होते. हे दव झाडांवर पडल्यानंतर त्यातून झाडे पाणी शोषून घेतात. त्यामुळे झाडांना वाढण्यास व फळधारणा करण्यास मदत होते. यावर्षी सुरुवातीपासूनच थंडी कमी पडत आहे. सध्या डिसंेबर महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी पारा ३१ डिग्री सेल्सीअस आहे. त्यात गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. खरीप हंगामात पिके गेल्यावर रब्बी हंगामापासून काही उत्पन्न मिळेल, अशा अपेक्षेने शेती करीत असताना हरभरा पिकाचेही नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  *ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी ओसरली आहे. याचा फटका हरभरा पिकाला बसणार आहे. ढगाळ वातावरण किडींना पोषक असल्यामुळे प्रादुर्भावही वाढला आहे. हरभर्‍यावर सध्या विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्‍यांना फवारणीसाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे.