शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या संभाजीने घराचा व्हरंडा बनविला पक्षांचे निवासस्थान

By admin | Updated: August 23, 2014 23:24 IST

परसबाग बनली अन्न, पाण्याच्या सोयीचे ठिकाण; सुरक्षेचीही घेतली जाते विशेष काळजी

वाशिम - वडीलांचे पक्षीप्रेम पाहून त्यांच्या पावलावर पाउल ठेवत कारंजा शहरातील पत्रकार कॉलनित राहणार्‍या संभाजी शिवाजीराव देशमुख या चौथीतील चिमुकल्याने आपल्या घराच्या व्हरांड्याला चिउताईंसह विविध पक्षांचे निवासस्थान बनविले आहे. तर आपल्या घरासमोरील परसबागेत त्याने पक्षांच्या अन्न व पाण्याची सोय केली आहे. विशेष म्हणजे पावसापासून संरक्षणाचीही व्यवस्था केली आहे.उन्हाळ्य़ाच्या दिवसात वर्तमानपत्र अन् दूरचित्रवाणीच्या माध्यमातून पक्षी जीवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले गेले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारंजाच्या पत्रकार कॉलनितील रहिवासी शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या घराच्या व्हरंड्यात व परसबागेत चार ठिकाणी पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व निवासाची सोय करण्याचा निर्णय एप्रील २0१२ मध्ये राबविला. पहिल्याच वर्षी मातिच्या मडक्यांच्या सहाय्याने निर्माण केलेले चारही घरटे दोन दिवसात फूल्ल झाले. त्यामुळे आणखी पक्षांची व्यवस्था म्हणून देशमुखांनी आणखी चार मातीच्या मडक्यांच्या सहाय्याने चार घरट्यांची निर्मीती केली. झाले असे की त्या आठ घरट्यांमुळे कधी नव्हे एवढा त्यांच्या घराचे परिसरात विविध प्रकारच्या पक्षांचा किलबिलाट वाढला. अर्थात चिउताई त्यात संख्येने जास्त होत्या. देशमुखांचे हे कार्य आसपासच्या अनेकांना आवडले. त्यांनी मुलाबाळासह देशमुखांच्या घराला भेट देवून त्यांच्या कार्याचे भरभरुन कौतूक करत आपल्या परिने त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु केला. नेमक पहायला येणार्‍या व्यक्तीच्या सोबतच परसबागेतील सर्व प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य शिवाजी देशमुखांच्या संभाजी नावाच्या चौथीतील चिमुकल्याला नकळत पक्षीप्रेमाकडे घेवून गेले. वडिलांच्या पक्षीसेवेत मदत करताना संभाजीने वडिलांचे काम कधी आपले करुन घेतले ते कुणाला कळलेच नाही.उन्हाळ्य़ात केलेले घरटे पावसाळ्य़ात स्वच्छ करायला निघालेल्या शिवाजीरावांना जेव्हा त्या घरट्यांमध्ये मैना, सुर्यक्षाची अंडी दिसली. तेव्हा त्यांनी व त्यांच्या मुलाने केवळ उन्हाळ्य़ापूरते हे काम न करता तिनही रुतूत पक्षांची अन्न अन पाण्याची सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी केवळ ८ घरटे निर्माण करणार्‍या देशमुख पितापुत्रांनी आपल्या घराचे व्हरंड्यात आजमितीला तब्बल २४ घरटे तयार केले असून या पक्षांच्या सोयीसाठी त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था आपल्या परसबागेत केली आहे. त्यांचे पक्षीप्रेम सर्वांसाठी आदर्श असून पक्षांच्या सेवेतून मिळणारा आनंद चिमुकला पक्षीप्रेमी संभाजी देशमुखसह त्याच्या सवंगड्यांना काही तरी निस्वार्थ सेवा आपल्या हातून घडण्याची प्रेरणा देवून जात आहे.** असे घरटे अशी व्यवस्था.....घराच्या १४ फुट उंचिच्या व्हरंड्यात व गॅलरीत मातीच्या मडक्यांना गोल आकाराचे छिद्र पाडून त्यावर मातीचेच झाकन लावून ती मडकी ताराने टांगून ठेवली आहेत. व्हरंड्यातील मडक्यांच्या वरील झाकनामध्ये धान्य ठेवले जाते. तर गॅलरित अशाच व्यवस्थेबरोबर पाण्याची वेगळी सोयही करण्यात आली आहे. मातीच्या मडक्यांपासून बनविलेल्या या घरट्यांमूळे चिमन्या व इतर आयत्या जागेत घर करुन राहणार्‍या पक्षांना उन्हाळ्य़ाच्या दिवसात उष्नतेपासून संरक्षण होण्यास मदत होते. ** देशमुखांच्या परसबागेसह घराचे व्हरंड्यात चिउताई, सुर्य पक्षी यासह सात ते आठ प्रकारच्या पक्षांचा व खारुताईचा मुक्त संचार आहे. खारुताईची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून कधी काळी चिउताईचा आवाज गोष्टींपूरता र्मयादीत असलेला चिमुकला संभाजी आता आपल्या दोस्तांना पक्षांच्या गोष्टी स्वनाभवातून सांगतांना दिसतो आहे. देशमुखांच्या या कार्यातूनच प्रेरणा घेत पत्रकार कालनितीलच माजी सैनिक मधूकर खाडे यांच्या पुढाकारातून कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये पक्षांसाठी खाद्यांन्न भांडार उघडण्यात आले आहे. या ठिकाणी कॉलनीतील रहिवासी आपल्या घरातील उरलेले पक्षी खाअ शकतील असे अन्न वाया न घालता आणून टाकत पक्षीबचाव कार्यात आपले योगदान देत आहेत.** मी करीत असलेली पक्षीसेवा पाहून माझा चिमुकला पक्षीप्रेमी कधी झाला मलाही कळले नाही. आता पक्षीसेवेच्या कार्यात त्यांने या वयातच स्वत:ला वाहून घेतले आहे. पक्षांना काय लागत, कधी लागत याची काळजी आता तोच करतो व लागणार्‍या वस्तू संपायच्या आत मला त्या आणायला लावतो.- शिवाजी देशमुख