अकोला : गणेश उत्सवामध्ये ह्यप्लॅस्टर ऑफ पॅरीसह्णच्या मुर्तींची स्थापना करण्यात येते. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी मातीच्या मूर्ती बनविल्या असून, या मूर्तींचीच स्थापना करण्यात येणार आहे. १00 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही जपल्या जाते; परंतु बदलत्या काळानुरूप त्याचे स्वरूप बदलत आहे. गत काही वर्षांपासून गणेश उत्सवाचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच मूर्तीला रासायनिक रंग देण्यात येते. त्यामुळे सार्वजनिक विहिरी, तलाव नद्यांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदुषण होते. परिणामी नागरिक, गुरे, पक्षी, वन्य प्राणी यांना पारा व सिसे या प्रदूषकांमुळे विविध आजार होतात. भविष्यात समृद्ध पर्यावरणासाठी सण उत्सव पर्यावरणपुरक पद्धतीनेच साजरे करावे लागतील. या अनुषंगाने निसर्गकट्टा व सातपुडा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक उत्सव उपक्रमांतर्गत जे. आर. डी. टाटा एड्यूलॅब, राजेश्वर कॉन्व्हेंट, आदर्श विद्यालय व इंग्लिश हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत २५0 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे हे आठवे वर्ष आहे. अमोल सावंत यांनी कार्यशाळेची भूमिका व शाडू मातीचे वैशिष्ट्ये विशद केली. यानंतर निसर्गकट्टाचे प्रेम अवचार, विजय पवार व गौरव झटाले यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या गणेश मूर्ती कशा बनवायचे, याचे प्रात्यक्षिक दाखविले.
पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी सरसावले चिमुकले
By admin | Updated: August 25, 2014 03:14 IST