शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात चिमुकला ठार; दोन जखमी

By admin | Updated: February 24, 2017 02:41 IST

वारक-यांच्या ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाची धडक

कवठा/ उरळ(अकोला), दि. २३- वाडी अदमपूर येथून शेगावकडे पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या दिंडीतील ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार घडकेत तीन वर्षीय सोहम विठ्ठल वारुळकर हा चिमुकला वारकरी जागीच ठार झाला तर अन्य तिघे वारकरी जखमी झाले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कवठा फाट्यानजीक घडली. वाडी अदमपूर दिंडीत वाडी, इसापूर, वाकोडी, वरूळा पंचक्रोशीतील एक हजार वारकरी सहभागी झाले आहेत. ही दिंडी निंबा फाटा मुक्काम आटोपून आज सकाळी ६ वाजता शेगावकडे मार्गस्थ झाली होती. निंबा फाट्यापासून २ कि. मी. अंतरावर कवठा फाट्याजवळ या दिंडीतील ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३0-६१४३ ला शेगाववरून निंबा फाट्याकडे द्राक्ष भरून जाणार्‍या मालवाहू वाहन क्र. एमएच ३0 बी ४0७२ ने ट्रॉलीच्या मध्यभागी जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॉली ६ फूट अंतरावर तुटून पडली. यामध्ये ट्रॉलीमध्ये चिमुकला वारकरी सोहम विठ्ठल वारुळकर हा जागीच ठार झाला तर आदीत्य शिवहरी वारुळकार, तन्वी शिवहरी वारुळकार हे गंभीर जखमी झाले.तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर मालक शिवहरी वारुळकर हे सोहमचे काका असून ते स्वत: ट्रॅक्टर चालवत होते. ते सुद्धा या अपघातात जखमी झाले.मालवाहू वाहन क्र. एबी-४0७२ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेने वारकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी मालवाहुचा चालकाविरुद्ध कलम २७९,३३७,४२७,३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय वानखडे, पोकॉ संतोष सोळंके करीत आहेत.