शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेत शिक्षक पदावर नियुक्तीसाठी द्यावी लागेल सीईटी परीक्षा

By admin | Updated: September 4, 2015 00:14 IST

राज्य परीक्षा परिषदेने उपसंचालकांना मागितला रिक्त पदांचा अहवाल.

खामगाव (जि. बुलडाणा) : खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरती शासनाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रिय निवड परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. या पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून रिक्त पदांची माहिती १५ सप्टेंबरपर्यत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १५ सप्टेंबरपर्यत शिक्षण उपसंचालक कार्यालयांकडून मागविली आहे. शासकीय अधिकार्‍यांना केआरऐव्दारे आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी शासनाने कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कृती कार्यक्रमानुसार यापुढे खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची शासनामार्फत करण्यात येणार असून पदभरती ही केंद्रीय निवड परीक्षेव्दारे होणार आहे. ही परीक्षा घेवून पदभरतीची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेवर सोपविली आहे. त्यानुसार जाहिरातीव्दारे ऑनलाईन अर्ज मागविणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती व निकाल जाहीर करावा लागणार आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावी लागणार असून शासनाच्या १४ ऑगस्ट रोजीचे पत्रानुसार खाजगी संस्थांव्दारे चालविण्यात येणार्‍या अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची माहिती या कार्यालयास १५ सप्टेंबर पर्यंंत शिक्षण संचालक कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. ही माहिती सादर करताना शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित पदे विचारात घ्यावी लागणार आहे. या पदांमधील रिक्त पदे भरताना शासनाने विहित केलेली पटसंख्या, आरक्षण व इतर निकष विचारात घ्यावे लागणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचाही विचार करण्यात येणार आहे. जेणेकरुन अनावश्यक पदभरती होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.