लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘सीबीएसई’ अंतर्गत उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेच्या रविवारी जाहीर झालेल्या निकालात स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या शंतनू नारखेडे याला ८९.२० टक्के गुण मिळाले आहेत, तर संचित सरोदे-८८.४०, चिन्मयी बोबडे-८६.८०, अमित नेमाडे-८६, विनय अहिर-८५.८०, श्रुती सदावर्ते-८२.८०, त्रिवेणी पाटील हिला ८०.६० टक्के गुण मिळाले आहेत. स्कूल आॅफ स्कॉलर्समधील या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.या परिक्षेला ३१ विद्यार्थी बसले होते. पैकी सात विद्यार्थी ए श्रेणीत उत्तीर्ण झाले.
‘सीबीएसई’ परीक्षेत अकोल्याचे सात विद्यार्थी अ श्रेणीत!
By admin | Updated: May 29, 2017 01:48 IST