शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मांसाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

By admin | Updated: September 22, 2014 00:39 IST

बुलडाणा जिल्हय़ाच्या हद्दीवर पोलिसांची कारवाई, १0 टन अवैध मांस जप्त.

डोणगाव (बुलडाणा) : बुलडाणा जिल्हय़ाच्या सरहद्दीवर नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी अवैध मांसाची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. ही कारवाई आज २१ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलिसांनी केली. त्यामध्ये ट्रकसह ५ लाख रुपयांचे १0 टन अवैध मांस जप्त करण्यात आले आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात सर्व मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. डोणगाव येथेही जिल्हय़ाच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ ठाणेदार डी.एम. घुगे, पोहेकाँ शरद बाठे, उमेश वाघ, शेख आसिफ, संजय ओशलकर, भानुसे हे रात्रीदरम्यान नाकाबंदी करीत होते. तेव्हा अमरावतीकडून येणारा एम.एच. ४३ ई ६३१८ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अवैधरित्या मांसाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकमधील मांस व सोबत ट्रकही जप्त केला. मांसाची अवैध वाहतूक करणारे सैय्यद सद्दाम हुसेन सैय्यद अलताफ हुसेन, इक्राम अहेमद शेख चाँद, इम्रान खान अफसर खान, जाकीर अहेमद अब्दुल समद रा. अमरावती व अबीद अहेमद अ. जलील रा. कारंजा जि. वाशिम यांच्याविरुद्ध कलम ६ (१), (२), ७९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम १८२, १८४, ८३/१७७ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर ट्रकमध्ये दहा टन मांस अंदाजे किंमत ५ लाख रुपये व अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल डोणगाव पोलिसांनी जप्त करून चारही आरोपींना अटक केली आहे. डोणगाव राज्य महामार्गावर अमरावतीवरून औरंगाबादकडे नियमित अवैध मांस वाह तूक होत असते; परंतु ठाणेदार घुगे यांनी अवैध मांस वाहतुकीवर अचानक केलेल्या कारवाईमुळे अवैध मांस वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले.