शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कौटुंबिक वादातून पत्नी व चिमुकलीस जाळले

By admin | Updated: December 26, 2014 01:26 IST

पती व चार दिरांचे क्रूर कर्म.

अकोला: कौटुंबिक वादातून पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीस रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास भगतवाडीतील नुरी प्लॉटमध्ये घडली. दोघी माय-लेकी गंभीर जळाल्या असून, त्यांच्यावर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी पतीसह चार दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. डाबकी रोड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल हसन खान यांना रूबिना परवीन अब्दुल मजिद (२४) हिने दिलेल्या जबानी तक्रारीनुसार, तिचा पती अब्दुल मजिद अब्दुल रफिक याच्यासोबत कौटुंबिक वाद होता. या वादातूनच रूबिना ही काही महिन्यांपासून तिच्या दोन वर्षीय मुलीसह माहेरी राहत होती. गुरुवारी ती भगतवाडीतील नुरी प्लॉटमधील तिच्या घरी आली आणि तिने पती अब्दुल मजिद याला माहेरकडील माझे सर्व सामान आणते आणि येथे राहते, असे म्हटले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. पती अब्दुल मजिद याने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि तिला मारहाण केली. त्यानंतर पती अब्दुल मजिद, तिचे दीर अब्दुल मुजिद अब्दुल रफिक, अब्दुल आसिफ अब्दुल रफिक, अब्दुल सादिद अब्दुल रफिक आणि अब्दुल वहिद अब्दुल रफिक यांनी रूबिना हिच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. यात रूबिना ही गंभीररित्या भाजली. तिला तातडीने सर्वोपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री उशिरा डाबकी रोड पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. तिच्या जबाबावरून आरोपींवर पोलिसांनी भादंवि कलम ३0७(३४) नुसार गुन्हा दाखल केले. *चिमुकलीची प्रकृती चिंताजनक चिमुकल्या मुलीला जाळल्यानंतर ती जागीच बेशुद्ध झाली. तिला व तिच्या आईला पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. आई रूबिना शुद्धीवर होती. तिने पोलिसांनी बयाणसुद्धा घेतले. रुबिनाची दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची प्रकृती मात्र गंभीर आहे. ती शुद्धीवर नसल्याचे पोलिसांनी सांगितले. *चिमुकलीवर रॉकेल ओततानाही नराधमांना फुटला नाही पाझररूबिनाचा पती व तिच्या चार दिरांनी अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. रूबिना आक्रोश करीत असताना, तिच्या चिमुकल्या मुलीनेही गलाबला केला. तिला आवाज ती देत होती. सुडाने पेटलेल्या नराधमांनी रूबिनाला पेटविल्यानंतर तिच्या चिमुकल्या मुलीला लक्ष्य गेले. त्यांनी तिच्या अंगावरही रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. निरागस, निष्पाप चिमुकल्या मुलीला पेटवून देतानाही तिचा पिता व काकांचे हात जराही थरारले नाहीत, ना त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. हा प्रकार समाजातील माणुसकी हरवत असल्याचे उदाहरण आहे.