शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा बँकेला परवान्यासाठी हवेत ५५ कोटी!

By admin | Updated: September 4, 2015 00:12 IST

केंद्राकडून मिळाली मदत; नाबार्डने घेतला आढावा.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला पुर्नरूज्जीवीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारच्या मदतीनंतर आता आणखी ५५ कोटीची गरज जिल्हा बँकेला आहे. राज्य शासनाने ही मदत दिल्यांनतर बँकेला परवाना मिळून येत्या ऑक्टोबरपर्यंंत बँक पुन्हा सुरू होण्याचे संकेत सुत्रांनी दिले. बुलडाणा जिल्हा बँकेला १६ मे २0१२ रोजी र्झिर्व्ह बँकेने ३५ (ए) ची नोटीस देऊन ठेवी स्विकारण्यास परवानगी नाकारल्यानंतर जिल्हा बँकेतील गैरप्रकाराची लक्तरे टांगल्या गेली. भारतीय रिझर्व बँकेने बँकीग रेग्युलेशन अँक्ट १९४९ नुसार कलम २२(५) अन्वये ९ मे २0१४ रोजी या बँकेचा बँकीग परवाना रद्द केला होता. यानंतर संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला, राजकारणही तापले, बँकेच्या अनेक शाखा बंद करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर कोट्यवधीच्या ठेवी अडकून पडल्याने हजारो ठेवीदारांचे बँक पुनरूज्जीवित कधी होते याकडे लक्ष लागले होते. केंद्र शासनाने बँकेला मदत करण्यासाठी १३७ कोटीचा निधी दिला व बँक पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. केंद्र शासनाने दिलेल्या या निधीनुसार जिल्हा बँकेला भांडवल पर्याप्तता म्हणजेच सीआरएआर निधी किती लागतो याचे सर्वेक्षण नाबार्डमार्फत करण्यात आले असून सीआरएआर कायम ठेवण्यासाठी बँकेला आणखी ५५ कोटीची गरज असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. यानुसार जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्या नेतृत्वातील प्रशासक मंडळाने राज्यशासन तसेच उच्च न्यायालयापुढे आपली भूमिका मांडली. राज्य शासनाने हा निधी द्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य शासनाकडून हा निधी मिळाल्यानंतर जिल्हा बँकेला परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून येत्या ऑक्टोबरपर्यंंत बॅक सुरू होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेला पुनरूज्जीवित करण्यासाठी प्राधिकृत मंडळाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. गुरूवारी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचा आढावा देण्यात आला. बँकेला परवाना मिळण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बँकेला परवाना मिळून बँक पुन्हा कार्यन्वीत होईल यात कुठलीही शंका नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी किरण करूंदकर यांनी सांगीतले.

              जिल्हा बँकांना त्यांची भांडवल पर्याप्तता म्हणजेच सीआरएआर ७ टक्के ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, बुलडाणा बँक ही पातळी गाठू शकली नाही, हे रिझर्व बँकेने स्पष्ट केले होते. केंद्र सरकारच्या निर्णयामध्ये आता सीआरएआर बाबत दोन निकष दिले आहेत. त्यामुळे बँकेला अडचणीतून बाहेर येण्यासाठी मार्च २0१५ पर्यंंत ७ % व मार्च २0१७ पर्यंंत ९% सीआरएआर ठेवावा लागणार आहे. त्यामुळे १२४ ऐवजी १३७ कोटीची मदत लागणार होती ती मदत केंद्र शासनाने दिली आहे. मदतीचे सवर्ेक्षणही नाबार्डकडून झाले. सीआरएआर कायम ठेवण्यासाठी ५५ कोटीची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष नाबार्डने काढला आहे