शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा कायम

By admin | Updated: September 22, 2014 00:40 IST

अध्यक्षपदी काँग्रेसच्या खंडारे, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खेडेकर.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून असलेला काँग्रेसचा दबदबा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कायम राहिला आहे. रविवारी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अलका चित्रांगण खंडारे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात ही निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अलका खंडारे तर शिवसेनेकडून अशोक इंगळे यांनी तसेच उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर व शिवसेनेचे विलास चनखोरे यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ४२ मते मिळाली तर भाजप-सेनेला प्र त्येकी १४ मतांवर समाधान मानावे लागले. भाजप-सेना युतीचे तीन सदस्य गैरहजर होते. ** शांततेत निवडजि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड ही अतिशय चुरशीची होत आली आहे. यावेळी मात्र ही निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. आघाडीची संयुक्त बैठक आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी काँग्रेसकडून निरीक्षक म्हणून जालन्याचे आर.आर. खडके, तर राष्ट्रवादीकडून वाशिमचे पांडुरंग ठाकरे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या खंडारे व राष्ट्रवादीकडून पांडुरंग खेडेकर यांचे नाव समोर आले व टाळ्यांच्या गजरात अनुमोदन देण्यात आले. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्व सदस्यांसोबत चर्चा केली होती.** काँग्रेसकडून जल्लोषात स्वागतकाँग्रेसच्या अलका खंडारे यांची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेपासून तर जिल्हा काँग्रेस कमेटीपर्यंत वाजतगाजत रॅली काढण्यात आली. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार दिलीपकुमार सानंदा, लक्ष्मणराव घुमरे, समाधान हेलोडे आदींच्या उपस्थितीत अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.