शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा बँकेला पॅकेज मिळणार

By admin | Updated: November 6, 2014 00:00 IST

केंद्र सरकार अनुकूल : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीवर चर्चा

बुलडाणा : डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी व ठेवीदारांना केंद्र सरकार दिलासा देण्याच्या मानसिकतेत असून बँकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पॅकेज देणार असल्याची माहिती आमदार पांडुरंग फुंडकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. आज दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांचा प्रश्न उपस्थित केला. विदर्भातील वर्धा, नागपूरसह बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँका सध्या शेवटच्या घटका मोजत असून, बुलडाण्याच्या बँकेवर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पॅकेज देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या बँकांचे पुनरुज्जीवन झाल्यास सहकार क्षेत्राला नव्याने बळकटी येईल तसेच शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ तातडीने देणे शक्य होईल. त्यामुळे या बँकांना पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुकूलता दाखविली असल्याची माहिती आ. फुंडकर यांनी दिली.दरम्यान, राज्य सरकारनेही जिल्हा बँकेला मदत देऊ केली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने त्या कालावधीत बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. या कारणामुळे सदर मदतीचा अध्यादेश हा वादाचा ठरला. १२८ कोटी रुपयांची असलेली ही मदत कोर्टाच्या तारखांमध्ये अडकली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाने कोर्टात दाद मागितली होती. मात्र, या मदतीच्या अध्यादेशात जर बँक सुरळीत असेल, तर मदत दिली जाईल, असे नमूद केले असल्याने मदतीची आशा मावळली होती. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे आता पुन्हा बँक सुरळीत होण्याची आशा पल्लवित झाली आहे.