शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल‘च्या केबलचा रस्ते विकासात अडथळा!

By admin | Updated: November 2, 2015 02:56 IST

सिव्हिल लाइन मार्गाचे काम सुरू

अकोला : शहरातील सहा प्रमुख मार्गांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला रविवारपासून सुरुवात झाली. सिव्हिल लाइन मार्गावर कंत्राटदार कंपनीने रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने खोदकाम सुरू केले असले तरी या कामात भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) भूमिगत केबलचा अडथळा निर्माण झाला आहे. अतवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची स्थिती वाईट झाली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. यात १८ रस्त्यांचा समावेश होता. यापैकी १२ रस्त्यांचे डांबरीकरण आणि ६ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. यात टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौकासह इतर चार मार्गांंचा समावेश आहे. त्यापैकी मुख्य डाक घर ते सिव्हिल लाइन चौकापर्यंतच्या मार्गावर ७५0 मीटरची लांबी आणि ७.५ मीटर रुंदीचे काम केले जाणार आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्याच्या खोदकामात दीड फुटावरच बीएसएनएलचे केबल असल्याने ते बाहेर आले. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला. भूमिगत केबल किमान १ मीटर खोल टाकणे आवश्यक असते. रस्त्याच्या खोदकामात ते १.५ फुटावरच टाकण्यात आले असल्याचे आढळून आले. याबाबत महापालिका प्रशासन आणि रस्त्याचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिली असून ते याबाबत कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.