शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

भावाचा खून

By admin | Updated: September 6, 2023 13:14 IST

शिर्डी : व्यसनाधीन असलेल्या व कुटुंबातील व्यक्तींना त्रास देणार्‍या तरुणाचा त्याच्या मोठ्या भावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला़

शिर्डी : व्यसनाधीन असलेल्या व कुटुंबातील व्यक्तींना त्रास देणार्‍या तरुणाचा त्याच्या मोठ्या भावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला़ या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी या मयत तरुणाच्या मोठ्या भावाला ताब्यात घेतले आहे़ पोलिसांच्या माहितीनुसार लक्ष्मण गणपत गुठळे (वय २८ ) हा व्यसनाधीन होता़ त्याची पत्नीही आठ महिन्यापासून माहेरी होती़ लक्ष्मण आपल्या आईला व मोठा भाऊ संतोष यास नेहमी मारहाण व शिवीगाळ करीत असे़ रविवारी रात्री असाच प्रकार घडल्याने संतोष याने लक्ष्मणला धडा शिकवण्यासाठी मारहाण केली़ यात लक्ष्मणला जीवे मारण्याचा हेतू नसला तरी मारहाणीत त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली़ मात्र जखमेचे गांभीर्य लक्षात न आल्याने लक्ष्मणला शेजारच्या खोलीत ठेवण्यात आले़ सकाळी दहाच्या सुमारास त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे लक्ष्मणला दाखल न करुन घेतल्याने पुन्हा घरी नेण्यात आले व साडेतीनच्या सुमारास त्यास गंभीर मारहाण झाल्याचे पोलिसांना कळविण्यात आले़ त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला संस्थान रुग्णालयात नेले़ तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले़ या प्रकरणी नातेवाईकांकडून गुन्हा दाखल करण्यास अंत्यविधीचे कारण सांगून चालढकल होत असल्याचे लक्षात येताच सुनील पवार यांनी स्वत: फिर्याद दाखल केली़ मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी संतोष याला ताब्यात घेतले़ तेथे त्याने कुणीतरी आपल्या भावाला मारहाण करुन घरासमोर आणून टाकल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांनी अनेक दुव्यांचा अभ्यास करुन संतोषला बोलता केल्यावर वरील हकीगत समोर आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले़ उपअधीक्षक विवेक पाटील व प्रभारी पोलीस निरीक्षक मिस्त्रीलाल बंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार,शहाजी आढाव, औटी आदींनी अवघ्या चोवीस तासात खुनाची उकल केली़ सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बत्तीसे पुढील तपास करीत आहेत़ (वार्ताहर)