शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

दिवसभरात दोघांचा मृत्यू, ३९१ पॉझिटिव्ह, ३९१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 20:13 IST

Coronavirus in Akola १० मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींचा आकडा ३९१ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवार, १० मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींचा आकडा ३९१ झाला आहे. आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३०५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८६ अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,८९१ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,९५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,६४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील २५, सावरा येथील १३, डाबकी रोड येथील १२, रामदास पेठ, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी आठ, जीएमसी, बाळापूर, मूर्तिजापूर, गौरक्षण रोड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी सात, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सहा, लहान उमरी, हरीहर पेठ, रामनगर, अमाखा प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी पाच, विद्या नगर, कीर्ती नगर, शिवणी, खदान, रजपूतपुरा, पळसो बढे व नेवारे नगर येथील प्रत्येकी चार, बालाजी नगर, हिंगणा, रतनलाल प्लॉट, शारदा नगर, खेडकर नगर, आदर्श कॉलनी, जामकी, महसूल कॉलनी व टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यू राधाकिशन प्लॉट, भिरडवाडी, खोलेश्वर, सांगळूद, हातगाव, शंकर नगर, गीता नगर व गोपालखेड येथील प्रत्येकी दोन, पंचशील नगर, नगर परिषद कॉलनी, बटवाडी, कोठारी वाटिका, संतोष नगर, महाकाली नगर, खंडाळा, चांदूर, जुनी वस्ती, वरुड, गजानन नगर, सोनोरी, सस्ती वाडेगाव, वनी रंभापूर, पोलीस हेडक्वॉटर, तेल्हारा, बैदपुरा, अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी तेल्हारा येथील दहा, जीएमसी व हिवरखेड येथील प्रत्येकी सहा, केडिया प्लॉट येथील चार, डाबकी रोड, तापडिया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, अनीकट, शास्त्रीनगर, खदान, रामदासपेठ, केशवनगर, थार व कारला येथील प्रत्येकी दोन, किर्ती नगर, अकोट फाइल, पोळा चौक, मोहम्मद अली चौक, पंचशील नगर, बाळापूर नाका, सुधीर कॉलनी, चांदुर ,भिमनगर, केला प्लॉट, सल्पी, कोठारी बाजार, गुरुदेव नगर ,महाकाली नगर ,रजपुतपुरा, रतनलाल प्लॉट, भांबेरी, शिवर व शिवणी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

महिला व पुरुषाचा मृत्यू

रेणूका नगर, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष व महसूल कॉलनी, अकोला येथील ७६ वर्षीय महिला अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. या दोघांनाही अनुक्रमे १ व ५ मार्च रोजी रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.

३२१ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५५, युनिक हॉस्पीटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, ग्रामीण आरोग्य बार्शीटाकली येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून १०, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून ११, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, बॉईज होस्टेल अकोला येथून १२, सहारा हॉस्पिटल येथून दोन, आधार हॉस्पीटल मूर्तिजापूर येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथुन तीन, तर होम आयसोलेशन येथून २०० अशा एकूण ३२१ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

४,८३७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,८९१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,६६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,८३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या