शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सिमकार्डची विक्री करणारे दोघे गजाआड

By admin | Updated: November 22, 2015 02:31 IST

दोन्ही युवक शेगावचे रहिवासी, उद्दिष्टपूर्तीसाठी आटापिटा.

अकोला - बनावट दस्तऐवजाच्या आधारे बोगस सिमकार्डची विक्री करणार्‍या दोघांना रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. हे दोन्ही युवक शेगाव येथील रहिवासी असून, त्यांना शिवाजी महाविद्यालयासमोर सिमकार्डची विक्री करताना रंगेहाथ अटक केली. शिवाजी महाविद्यालयासमोर शेगाव येथील मोहम्मद नाजीम वलीम मोहम्मद, शेख रशीद शेख रउफ हे बोगस सिमकार्डची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून सिमकार्ड विक्रेत्यांची झाडझडती घेतली. यामध्ये दोन्ही युवक सिमकार्ड विक्री करताना दस्तऐवजांवर खरेदीदारांऐवजी स्वत:च स्वाक्षरी करीत असल्याचे दिसून आले. यामध्ये या दोन्ही युवकांनी गंगुबाई व अमीना या दोन महिलांच्या नावावर खासगी कंपनीचे अनेक सिमकार्ड विक्री केल्याचे समोर आले. रामदासपेठ पोलिसांनी या दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी बोगस सिमकार्डची विक्री केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. यावरून रामदासपेठ पोलीस ठाण्यातील अंबादास खांडवाय यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद नाजीम वलीम मोहम्मद, शेख रशीद शेख रउफ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४६७ (बोगस दस्तऐवज तयार करणे), ४७0 (बोगस दस्तऐवज खरे असल्याचे भासविणे), ४७१ (बोगस दस्तऐवज कामात आणणे) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या दोन्ही युवकांनी सिमकार्ड विक्रीचा केलेला हा आटापिटा केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली.

*तिसरा आरोपी लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत!

            बोगस सिमकार्ड विक्री प्रकरणातील तिसरा आरोपी फिरोज खान अहमद अली खान हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली. रामदासपेठ पोलिसांनी कारवाई केली, त्यावेळी या प्रकरणात दोनच आरोपी होते. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील तिसरा आरोपी फिरोज खान याचे नाव समोर आले. त्याचे या आठवड्यात लग्न असल्याने पोलिसांनी अटकेची कारवाई टाळल्याची माहिती आहे. फिरोज खान हा कंपनीचा सिमकार्ड वितरक असून, तो अकोल्यासह वाशिम व बुलडाणा येथेही सिमकार्डची विक्री करीत असल्याची माहिती आहे.