शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:22 IST

अकोट : अकोट वन्यजीव विभागांतर्गत दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत असताना सोनाळा परिक्षेत्रातील पळसकुंडी या बिटमध्ये मात्र एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट वन्यजीव विभागांतर्गत दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत असताना सोनाळा परिक्षेत्रातील पळसकुंडी या बिटमध्ये मात्र एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पळसकुंडी बिटमध्ये १६ जुलै रोजी वन विभागाचे पथक गस्तीवर असताना एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा, सहायक वनसंरक्षक व्ही.डी. डेहनकर, मानद वन्यजीव रक्षक सावंत, देशमुख, विशाल बनसोड, मनजीतसिंग यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी फारुक यांनी घटनास्थळ गाठले. या ठिकाणी वाघाचे सर्व अवयव व कातडी जागेवरच कुजलेल्या अवस्थेत आढळून आली. या वाघाचा दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे निष्पन्न होत असून, हा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असावा, असे सकृतदर्शनी दिसत असल्याचे उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा यांनी स्पष्ट केले. घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार विल्हेवाटीची कार्यवाही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान वाघाचे संवर्धन व संरक्षणाकरिता केंद्र व राज्य सरकार गंभीर असताना अकोट वन्यजीव विभागाच्या परिक्षेत्रात मात्र वाघाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा यांनी आपल्या कार्यालयातर्फे काढलेल्या पत्रकात वाघाचा दोन-तीन दिवसांपूर्वी निष्पन्न होत असल्याचे नमूद केले आहे.