शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या तेरवीऐवजी राबविला रक्तदानाचा उपक्रम

By admin | Updated: April 27, 2015 01:37 IST

रुढी, परंपरेला फाटा देत अकोला शहरातील राठी कुटुंबाचा असाही पुढाकार

अकोला: रूढी, परंपरेच्या फेर्‍यातून माणसाचे मरण सुटलेले नाही. रूढी, परंपरेनुसार तेरवी, गोडजेवण, पूजापाठ, शांतीपाठ वगैरेसारखे कार्यक्रम घेतले, तर मृतक व्यक्तीला सद्गती मिळते, असा समज भारतीय समाजमनात आहे. परंतु खोलेश्‍वरातील राठी कुटुंबाने रूढी, परंपरेला बाजूला सारत ज्येष्ठ समाजसेवी स्व. लीलाधर राठी यांच्या तेरवीऐवजी गरजू रुग्णांसाठी रक्तदानाचा उपक्रम घेऊन समाजासमोर एकप्रकारे आदर्शच निर्माण केला. समाजामध्ये अनेक सकारात्मक बाबी घडताना दिसून येत आहेत. मरणोत्तर देहदान, नेत्रदानासारखे उपक्रम राबविले असताना, आपण वडिलांच्या निधनानंतर त्यांचे देहदान किंवा नेत्रदान करू शकलो नाही. याची खंत स्व. प्रा. लीलाधर राठी यांचे चिरंजीव प्रशांत व सुशांत राठी यांना वाटत होती. प्रशांत राठी हे रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य असल्याने, त्यांनी रूढी, परंपरांना बाजूला सारत, वडिलांच्या तेरवीच्या दिवशी रक्तदानासारखा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला. माहेश्‍वरी युवा संघटनेच्या सहकार्याने त्यांनी २0 एप्रिल रोजी माहेश्‍वरी भवन येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. प्रशांत यांचा मुलगा प्रसन्न राठी याने सर्वप्रथम रक्तदान केले. तसेच राठी कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळींनीही रक्तदान केले आणि रक्ताच्या २५ पिशव्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या स्वाधीन केल्या. राठी कुटुंबाने वडिलांच्या तेरवीच्या दिवशी गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून एक प्रेरणादायी सुरुवात करून समाजासमोर एकप्रकारे आदर्शच निर्माण केला.