शहरातील शिबिरात ६५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. डॉ.हेगडेवार रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.किशोर पिंपरकर, डॉ.आशुतोष कुळकर्णी, डॉ.साधना कुळकर्णी, डॉ.ज्योती कोकाटे व सुमन दिदी यांनी केले. शिबिरास माजी गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी भेट दिली. यशस्वितेसाठी डॉ.स्वाती सांगळे, डॉ.आनंद चर्तुवेदी, डॉ.अरविंद गुप्ता, डॉ.कृष्णमुरारी शर्मा यांनी योगदान दिले. यामध्ये रा. तो. आयर्वेद महाविद्यालय, प्रजापिता ब्रम्हकुमारी मेडीकल विंग, जेएसपीएल, एमएसएमआरए, वूमन फोरम-निमा, ऊर्जा फाऊंडेशन अशा विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. शिबिरात डॉ.मंजू तोष्णीवाल, डॉ.स्वाती सांगळे, डॉ.माधुरी सोनी, डॉ.सीमा वाकचवरे, डॉ.माया ठाकरे, डॉ.अलका कंठे, डॉ.माया कराळे, डॉ.कल्पना भागवत, डॉ.मनोहर घूगे, डॉ.उज्वल कराळे, डॉ.अनिरुद्ध कुळकर्णी, डॉ.अतुल देशमुख, डॉ.नरेंद्र श्रीवास, डॉ.स्वप्नील गावंडे, दिपक मायी, मनिष श्रावगी, कविता चांडक, संजय तिकांडे, रमेश देशपांडे, डॉ.पंकज गुप्ता, डॉ.समाधान कंकाळ, डॉ.चंद्रकांत धनोकार, शरद राठी, डॉ.वर्षा देशपांडे, पियूष घूगे, डॉ.राजेश देशमुख, डॉ.कविता अग्रवाल उपस्थित होते.
फाेटाे