शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आंधळ्या शेतक-याची डोळस शेती

By admin | Updated: November 23, 2015 01:03 IST

दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्यावरही नशिबापुढे हार न मानता, उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पादन घेण्याचा शेतक-याचा विक्रम.

महादेव जउळकर/ अनसिंग (जि. वाशिम): जन्मत: दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्यावरही नशिबापुढे हार न मानता, उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पादन घेण्याचा विक्रम येथील संजय दुधाट या शेतकर्‍याने केला आहे. भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्याबाबत दुधाट यांनी परिसरातील शेतकर्‍यांनाही मागे टाकले असून, दररोज शेतात जाऊन तेथील कामे स्वत: करण्याची किमया ते लिलया पार पाडतात. जन्मत:च आंधळे असल्याने संजय दुधाट यांनी पोकाळी या गावातील वसंतराव नाईक अंध विद्यालयात ब्रेल लिपीतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अनसिंगला राहून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी जाऊन मुलाखती दिल्या; परंतु पाच वर्षे मेहनत घेऊनसुद्धा शासकीय नोकरी मिळू शकली नाही. पण त्यामुळे संजयने हताश झाला नाही. दरम्यान, वडिलांनी त्याचा विवाह चिवरा येथील मुलीशी करून दिला. आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी संजयने शेती करण्याचे ठरविले. संजयवर दोन मुले व पत्नी यांची जबाबदारी पडली. त्यानंतर त्यांनी दुसर्‍यांवर अवलंबून न राहता वडिलोपाजिर्त मिळालेल्या शेतीमध्ये स्वत: कष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडिलोपार्जित गावाजवळ असलेल्या अडीच एकर शेतामध्ये जाऊन स्वत: उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. संजय दुधाट हे घरापासून तर शेतात दररोज कुणाचीही मदत न घेता एकटेच जातात. शेतात गेल्यावर मजुरांकडून शेती करून घेतात तसेच शेतात भावाने धरणावरून पाइपलाइन करून दिल्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. शेतात काम करीत असताना काही दिवस त्यांचे मोठे बंधू कैलास दुधाट व संजयची पत्नी यांनी त्यांना मदत करुन शेतीबाबत माहिती दिली. शेतीबाबत माहिती घेतल्यानंतर ते स्प्रिंकलरने पाणी देऊन भाजीपाला उत्पादन तसेच ओलिताची शेती करीत आहेत. संजय दुधाट यांनी अंधत्वावर मात करून शेतात हरभरा, तूर, सोयाबीन अशा पिकांतूनही लाखो रुपये मिळवत आपला संसार सुखाचा केला आहे.