शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना युतीचे भिजत घोंगडे!

By admin | Updated: November 20, 2015 02:34 IST

दोन्ही पक्षांकडून तयारी; युतीच्या निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष.

मनोज भिवगडे / अकोला : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला अद्याप युतीबाबत निर्णय घेता आला नाही. शेवटच्या क्षणी युती होण्याची अपेक्षा करीत असलेल्या उमेदवारांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच प्रतिष्ठेची होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी जाहीर करून इतर पक्षांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निश्‍चित मानले जात असताना या पक्षाच्या युतीचे मात्र भिजत घोंगडे आहे. निवडणूक जाहीर होण्याची तारीख जवळ आली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंंत कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. असे असतानाही युतीच जाहीर झाली नसल्याने इच्छुक उमेदवारांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे. या मतदारसंघात गत दोन वेळा शिवसेनेने बाजी मारली आहे. आता तिसर्‍यांदा शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांना तूर्तास तरी मित्रपक्ष भाजपसोबत युती होण्याचा विश्‍वास आहे. त्यामुळेच त्यांनी नगरपालिका पिंजून काढत नगरसेवकांच्या भेटी सुरू केल्या आहेत. युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपतर्फे वसंतराव खंडेलवाल यांचे नाव आघाडीवर असून, त्यांनी नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. युती झाली तर या मतदारसंघात शिवसेनेला तिसर्‍यांदा संधी मिळणार, हे निश्‍चित आहे. अन्यथा दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढतील.

*भारिपची भूमिका ठरणार महत्त्वाची

       आर्थिक निकषांवर या मतदारसंघाची निवडणूक लढविली जाते. त्यामुळे पक्षाचे मतदार त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहतील, अशी शक्यता कमी असल्याने तिन्ही जिल्ह्यात ५९ मतं असलेल्या भारिप-बहुजन महासंघाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.