शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओं’विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविणार!

By admin | Updated: September 13, 2016 03:06 IST

अकोला जि.प. स्थायी समिती सभेत सदस्य आक्रमक.

अकोला, दि. १२: जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर सोमवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार गटविकास विकास अधिकार्‍यांविरुद्ध (बीडीओ) कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले. वारंवार सूचना देऊनही जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला पंचायत समितींचे गटविकास अधिकारी उपस्थित राहत नसल्याने, यासंदर्भात कारवाईचा ठराव मागील स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुषंगाने काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा स्थायी समितीच्या सभेत विजय लव्हाळे यांनी केली. सभेला ह्यबीडीओह्ण हजर राहत नसल्याच्या मुद्दय़ावर विजय लव्हाळे, शोभा शेळके, डॉ. हिंमत घाटोळ, रामदास लांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत, कारवाई करण्याची मागणी लावून धरली. यासंदर्भात ह्यबीडीओंह्णविरुद्ध कारवाईच्या ठरावाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे सभागृहात सांगितले. पातूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांच्याकडील तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा आकसापोटी प्रभार काढण्यात आल्याचा आरोप सदस्य लव्हाळे यांनी सभेत केला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, कृषी सभापती माधुरी गावंडे, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांच्यासह सदस्य दामोदर जगाताप, विजय लव्हाळे, रामदास लांडे, शोभा शेळके, डॉ. हिंमत घाटोळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.