शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकरांचे खामगाव, शेगावात जंगी स्वागत

By admin | Updated: July 11, 2016 03:17 IST

शेगाव येथे आगमन होताच त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

खामगाव : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शेगाव व खामगाव येथे सोमवारी आगमन होताच कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शेगाव येथे आगमन होताच त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी विदर्भातील भाजपा पदाधिकार्‍यांनी शेगाव तसेच खामगावात उपस्थित राहून ना. भाऊसाहेब फुंडकर यांचा सत्कार केला. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना मोठय़ा संख्येने कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शेगाव तसेच खामगावात चौकाचौकांत ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे विविध मंडळ, सामाजिक संस्था, अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आदींनी स्वागत केले. शेगाव ते खामगावदरम्यान गावागावांत स्वागत करण्यात आले. शेगावात मिरवणूक निघाली असता आ.डॉ. संजय कुटे हे सुद्धा ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाहनात न बसता कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले होते. खामगाव येथील मिरवणुकीत ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान दोन ठिकाणी ना. भाऊसाहेब फुंडकर यांची लाडुतुला करण्यात आली. खामगाव शहरात दुपारी सुरू झालेली मिरवणूक संध्याकाळपर्यंत सुरू होती. दिवसभर संततधार सुरू असतानाही कार्यकर्ते उत्साहाने मिरवणुकीत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देणार-फुंडकर

          शेगावचा विकास व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न केले आहेत. आराखड्याची सुरुवातही मीच केली आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना संतनगरीत विकास आराखडा राबविण्याची सर्वप्रथम विधान परिषदेच्या सभागृहात मागणी केली . त्यावेळी त्याला मान्यताही मिळाली . मात्र त्यानंतर हा आराखडा रखडला असून, त्याची किंमतही वाढली आहे. विकास आराखड्याला गती देऊन तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मी स्वीकारली असून आता हा विकास आराखडा गतीने पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला.