शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... तुम्ही पिताय ते दूध नव्हे विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : शरीर तंदुरुस्त व निरोगी राहावे, रोगराई दूर व्हावी आणि पौष्टिकता टिकून राहावी, यासाठी आपण दररोज दूध घेतो; ...

अकोला : शरीर तंदुरुस्त व निरोगी राहावे, रोगराई दूर व्हावी आणि पौष्टिकता टिकून राहावी, यासाठी आपण दररोज दूध घेतो; मात्र हेच दूध आज विष ठरत आहे. गाई-म्हशींची दूध देण्याची नैसर्गिक क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचा वापर पशुपालक करत आहेत. जिल्ह्यातील गोठ्यात गाई-म्हशींना खुलेआम ऑक्सिटोसिन दिले जात आहे. शहरात पोलिसांकडून झालेल्या कारवाईमुळे या प्रकाराला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.

ऑक्सिटोसिन या कृत्रिम हार्मोनचा वापर केवळ आणीबाणीच्या प्रसंगीच करणे अपेक्षित आहे; मात्र दुर्दैवाने याचा वापर भलत्याच कारणांसाठी होत आहे. मनुष्यांसाठी तयार करण्यात आलेले हे इंजेक्शन जनावरांसाठी वापरण्यात येत आहे. जिल्ह्यातील काही पशुपालक गाई-म्हशींचे जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी हे हार्मोन वापरत आहे. शहरी भागात चारा कमी असतो. तसेच गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे ओला किंवा कोरडा दुष्काळ पडत आहे. परिणामी, चाराटंचाई भासते. चारा कमी म्हणून गुरे दूधही कमी देतात. त्यातूनच त्यांच्यावर या हार्मोनचा वापर करून अधिक दूध मिळवण्याचा गोरखधंदा सुरू झाला. पशुपालक सकाळ-संध्याकाळ गुरांना दोन इंजेक्शन्स देतात. बंदी असतानाही चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होत आहे. शहरातील काही व्यक्ती जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी या इंजेक्शनची विक्री करीत आहे.

शहरात विक्रीचा प्रकार उघडकीस!

ऑक्सिटोसिनचा गुरांवर वापर म्हणजे क्रौर्याची परिसीमाच आहे. त्याचा फटका केवळ प्राण्यांनाच नव्हे, तर माणसांनाही बसतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे इंजेक्शन विकल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या इंजेक्शनचा मोठा साठा दहशतवादविरोधी पथकाने खदान परिसरातून काही दिवसांआधी जप्त केला. यामध्ये २,१३५ नग बाॅटल होत्या.

लहान मुलांना धोकादायक!

दुधात ऑक्सिटोसिनचे अत्यल्प प्रमाण येते; पण हे थोडे प्रमाणच स्लो पॉयझनिंगचे काम करते. त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळते. जास्त काळ अशा दुधाचे सेवन केल्यास लहान मुलांना धोका निर्माण होतो, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन आवश्यक

माणसांसाठी बनलेले हे इंजेक्शन घेण्यासाठी नियमाप्रमाणे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते. पशू अधिनियम १९६०च्या कलम १२ आणि अन्न व औषध भेसळ कायद्यानुसारही या हार्मोनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही शहरात त्याची बिनबोभाट विक्री होत आहे. १ मिली इंजेक्शनची किमत केवळ २१ रुपये आहे.

काय आहे ऑक्सिटोसिन?

ऑक्सिटोसिन हे मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत तयार होणारे आणि तेथेच साठवले जाणारे हार्मोन आहे. महिलांमध्ये प्रसूती वेदना वाढवून गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी स्टिम्युलेटर म्हणून या हार्मोनचा वापर डॉक्टर करतात. तसेच दूध येण्यासाठी उत्प्रेरक म्हणूनही ते काम करते. त्याच्या अति वा चुकीच्या वापरामुळे गर्भाशयाची पिशवी फाटण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे केवळ अत्यावश्यक प्रसंगीच त्याचा वापर केला जातो.

ऑक्सिटोसिनचा वापर गुरांवर व्हायला नको, हे धोकादायक ठरू शकते. पशुवैद्यकीय व वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन शिवाय हे इंजेक्शन मिळायला नको तसेच पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय पशुपालकांनी गुरांवर कोणत्याही इंजेक्शनचा वापर करू नये.

- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन

थियरीतून वेगवेगळे निष्कर्ष

दररोज दुधात याचा अंश येत असेल तर ही गंभीर बाब असल्याचे एका थेयरीत सांगितले आहे. तसेच दुसऱ्या थेयरीत, सामान्यत: दूध उकळून पिल्या जात असल्याने त्यातील ऑक्सिटोसिनचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; परंतु याबाबत अद्याप प्रमाण नाही.