शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : वाहन रस्त्यात उभे करून बाजूला उभे राहणे, आपल्या वाहनाला येऊन धडक देणे व नंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : वाहन रस्त्यात उभे करून बाजूला उभे राहणे, आपल्या वाहनाला येऊन धडक देणे व नंतर रस्त्यावर वाद घालून पैशाची मागणी करण्याचे प्रकारात गत काही दिवसांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. रस्त्यावर विनाकारण काेणी वाद घालत असेल तर अशा नागरिकांपासून सावध राहणे गरजेचे झाले आहे.

अकाेला शहर परिसरात अनेक अशा टाेळ्या निर्माण झाल्या असून वाहनचालकांची चूक नसताना त्याची चूक असल्याचे भासवून रस्त्यावर वाद घालणे, लाेेकांना जमा करणे व पैसे उकळल्या जात आहेत. सर्वसामान्य माणूस वाद नकाे म्हणून यातून सुटका करण्यासाठी पैसे देऊन माेकळा हाेत आहे. काही जण तर चक्क पाेलीस स्टेशनमध्ये तक्रारी करीत असल्याने सर्वसामान्यांची डाेकेदुखी वाढली आहे. याकडे पाेलीस प्रशासनाने लक्ष देऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

------------

रस्त्यावर अनेकांकडून घेतले पैसे

आपले वाहन रस्त्याच्या मधात ठेवावे व जराही धक्का लागला तर वाद घालून वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार शहराबाहेरील रस्त्यावर घडलेले आहेत. वाद नकाे, पाेलिसांची झंझट नकाे म्हणून अनेकांनी पैसे देऊन माेकळे झाल्याने या प्रकारात वाढ हाेत आहे.

--------------------

पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या

रस्त्यात वाहने उभी करून विनाकारण वाद घालणे किंवा स्वत:हून आपल्या वाहनाला धडक देणे व नंतर माझ्या वाहनाचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी वाद घालणे किंवा पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

------------

काय काळजी घ्याल?

रस्त्यावर काही कारण करून काेणी वाद घालत असेल तर शक्यताेवर त्याचे एकूण घ्यावे व त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. तरीही काहीही न ऐकता पैशाची मागणी करीत असल्यास पाेलिसांत तक्रार करावी. अन्यथा आपली फसवणूक हाेऊ शकते.