शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण

By admin | Updated: August 23, 2014 22:08 IST

कायापालट योजना : दोन टप्प्यात राबविणार

बुलडाणा : लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्याची आरोग्य विभागातर्गंत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे. याबाबत आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांना लेखी सुचना देत पश्‍चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्याचे आदेश दिले आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरवस्था दूर करून गावागावात आरोग्य मंदीर म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रांच्या सौंदर्यीकरणासाठी कायापालट योजना राबवण्याचा निर्णय डिसेंबर २0१३ मध्ये घेतला होता. दोन टप्प्यात ही योजना राबवण्याचा अँक्शन प्लॅनही तयार करण्यात आला. हा प्लॅन एकून दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामपंचायती व तालुकास्तरीय अधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामार्फत आरोग्य केंद्राच्या सुशोभीकर करण्यात येणार आहे.** असे होणार सुशोभीकरणलोकसहभागाच्या माध्यमातून खासगी दवाखान्यांना लाजवेल असे आरोग्य केंद्र करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार व्यवस्थित बसवून घेण्याबरोबरच आरोग्य केंद्राच्या सभोवती बागबगीचा तयार करणे. आरोग्य केंद्रात प्रवेश केल्यानंतर वेटींग रूम, टीव्ही आणि म्यूझीक सिस्टीमसह आरामदायी बैठक व्यवस्था तयार करणे, केंद्रात रूग्णासाठी स्वच्छ बेड, गरम पाणी उपलब्ध करणे तसेच आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणार्‍या शासकीय योजनांचे माहिती फलकही आरोग्य केंद्रात लावणे.** वैद्यकीय अधिकार्‍यांचा अभ्यास दौराकायापालट योजनेअंतर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा पश्‍चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी दिल्या आहेत.