शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जोडीदार ऑनलाइन शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच होऊ शकतो खिसा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

अकाेला : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. विवाह बंध जोडून देणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटलाही निशाणा ...

अकाेला : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. विवाह बंध जोडून देणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटलाही निशाणा बनविले जात आहे. जर तुम्हीदेखील अशा यूजर्सपैकी असाल जे जोडीदार शोधण्यासाठी आणि लग्नासाठी मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सचा वापर करतात, तर सावधा राहा. कारण, वर-किंवा वधू दाखविण्याच्या उद्देशाने तुमची लाखोंची फसवणूक होऊ शकते. जाेडीदार आयुष्यात येण्याआधी तुमचा खिसा ऑनलाइन हॅकर्सकडून रिकामा करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत.

मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सचा जर तुम्ही वर किंवा वधू शोधण्यासाठी वापर करीत असाल तर आजच तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण, या साइटसचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, अनेकांची फसवणूकही होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात असे दाेन प्रकार घडले असून, प्रत्यक्ष मुलगी दाखवूनही लूटमार झाल्याच्या घटना अकाेल्यातील डाबकी राेड, जुने शहर व पातूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आहेत. यामध्ये केवळ मुलांचीच नाही तर मुलींचीही फसवणूक होत असल्याने दोन्हीकडील मंडळींनी सावध होण्याची वेळ आली आहे.

..ही घ्या काळजी

मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ई-मेल आयडीचा वापर करावा. यासोबतच मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खासगी गोष्टी शेअर करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. सरकारने यूजर्सला सूचना दिली आहे की, कोणत्याही मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. यासाठी वेबसाइटचे रिव्ह्यूज वाचावे आणि कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र आणि कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या, अशा प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

..अशी होते फसवणूक

मॅट्रीमोनिअल वेबसाइट्सद्वारे फ्रॉड करणारे कोणतीही इमर्जन्सी असल्याचे सांगून पैसे खात्यात टाकण्यास सांगतात. तसेच गिफ्ट पाठवले असून, त्यासाठी टॅक्स मनी ट्रान्स्फर करण्यास सांगून फसवणूक करतात तर वर आणि वधूचे फोटो जे की खोटे असतात, त्यांचा पत्ता, संपर्क क्रमांक याचा कुठलाही ताळमेळ नसतो अशांची माहिती पुरवून तुमची फसवणूक केली जाते.

कोणतीही लिंक डाऊनलोड अथवा फाॅरवर्ड करण्याआधी विचार करा, अधिकृत साइटलाच भेट द्या, पैशाचे व्यवहार करताना त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा, विवाहासंबंधी गोष्टीमध्ये मध्यस्थी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यापेक्षा प्रत्यक्ष स्थळाला भेट द्या.

- सचिन कदम

शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला