शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बँकेत ठणठणाट!

By admin | Updated: April 26, 2017 01:59 IST

शेतकऱ्यांसह खातेदार चिंतेत: तीन दिवसांपासून विड्रॉलच झाला नाही!

अंदुरा : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पैसा नसल्यामुळे ठणठणाट आहे. मागील तीन दिवसांपासून बँकेत विड्रॉलच झाला नाही. परिणामी, शेतकऱ्यांसह खातेदारांना पैसे न मिळताच आल्या पावली परतावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना व खातेदारांना बँकेच्या या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अंदुरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत परिसरातील सोनाळा, बोरगाव, हातरुण, दुधाळा, खंडाळा, कारंजा रम., नया अंदुरा, मोरझाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांसह नागरिकांचे खाते आहेत. या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील कापूस व धान्य विकून मिळालेला मोबदला जमा करण्यात आलेला आहे. आता खरीप पिकाच्या नियोजन, तयारीची लगबग सुरू आहे. खरीप पिकाचे नियोजन करताना शेतीच्या मशागतीसाठी व लग्नसराईच्या काळात बँकेकडे पैशांसाठी धाव घेतली असता बँकेमध्ये पैशांचा ठणठणाट आहे. शेतकऱ्यांचा विड्रॉल होत नसल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील तीन दिवसांपासून बँकेमध्ये विड्रॉल न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना व खातेदारांना बँकेमधून आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अवैध सावकाराजवळून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे काढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. परिसरात अवैध सावकारीत वाढ४खरीप पिकाचे नियोजन करताना शेतीच्या मशागतीसाठी व लग्नसराईसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अवैध सावकाराजवळून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे काढत आहे. बँकेच्या अशा धोरणामुळे अवैध सावकारीला चालना मिळत आहे.