अकोला: अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये, यासाठी चार्याची जिल्हय़ाबाहेर वाहतूक करण्यास बंदी करण्यात येत असल्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. जमिनीतील ओलावा खोल गेल्याने रब्बी हंगामातील पिकांचेही उत्पादन बुडाले. नापिकीच्या परिस्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादनातही घट झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात जनावरांच्या चाराटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा उपलब्ध नसल्याने, जनावरांना जगविण्यासाठी चारा कोठून आणावा, असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालक शेतकर्यांसोर उभा आहे. येत्या उन्हाळ्यात चाराटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याने, जिल्ह्यात सद्यस्थितीत उपलब्ध असलेला चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये, तसेच जिल्ह्यातील चार्याची जिल्ह्याबाहेरील व्यापार्यांकडून खरेदी होऊ नये व जिल्ह्यातील चार्याची वाहतूक जिल्ह्याबाहेर होऊ नये, यासाठी चार्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत, जिल्ह्यातील चार्याची जिल्हय़ाबाहेर वाहतूक करण्यास बंदी करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवार, ९ जानेवारी रोजी काढला.
अकोला जिल्हय़ाबाहेर चारा वाहतुकीवर बंदी
By admin | Updated: January 11, 2015 01:23 IST