शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील दहा आरओ प्लान्टवर बंदी

By admin | Updated: May 28, 2017 03:54 IST

भारतीय मानक ब्यूरोचे निकषांचे उल्लंघन

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाण्याचे शुद्धीकरण आणि शीतकरण, पॅकेजिंगसंदर्भात भारतीय मानक ब्यूरोने ठरवून दिलेला एकही निकष न पाळणार्या जिल्ह्यातील दहा रिव्हर्स ऑस्मॉसिस (आरओ) प्लान्ट बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. शनिवारपर्यंंंत जिल्हय़ातील दहा आरओ प्लान्टसंदर्भात ही कारवाई करण्यात आली.सध्या सर्वत्र आरओ प्लान्टमध्ये शुद्धीकरण व शीतकरण केलेले पाणी मोठय़ा प्रमाणात पिण्यासाठी वापरले जात आहे. घरगुती वापरासह मोठय़ा समारंभात या पाण्याची मागणी प्रचंड आहे. त्यासाठी आरओ प्लान्टच्या रूपाने एक स्वतंत्र उद्योगाची निर्मितीही शहरासह ग्रामीण भागात झाली आहे. त्या प्लान्टमधून प्रक्रियेनंतर पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी आरोग्यासाठी किती घातक आहे, ही बाब उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून पुढे आली. शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्या रसायनांचा काही अंश पाण्यात शिल्लक राहतो. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या गंभीर बाबीची दखल भारतीय मानक ब्यूरोने घेतलेली आहे. त्यातच पाण्यावर प्रक्रिया आणि त्यानंतर पॅकेजिंगसाठी घ्यावयाची काळजी, याबाबतचे ब्यूरोने ठरवून दिलेले निकष प्लान्टमध्ये पाळले जात नाहीत. त्यामध्ये पाण्यातील रासायनिक, जैविक घटकांचे प्रमाण किती असावे, हे तर सोडाच, त्या पाण्याची प्लास्टिक पाऊच, हवाबंद बाटल्या आणि कॅनमध्ये पॅकिंग करण्याची प्रमाणित (स्टँडर्ड) पद्धतही पाळली जात नाही. त्यातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे या पद्धतीने पाणी प्रक्रियेवर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या निर्देशानुसार, भारतीय मानक ब्यूरोचे निकष न पाळणार्या आरओ प्लान्टवर बंदी घालण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक प्लान्टमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. बीआयएसचे सर्वसाधारण निकषभारतीय मानक ब्यूरोच्या निकषानुसार, प्रमाणित टेस्ट उपकरण असणे, तेथे वापरल्या जाणार्या काचेच्या वस्तू, रसायनांची यादी ठेवणे, उत्पादन, कंटेनर नमुन्याचे विवरण ठेवणे, प्रक्रियेनंतर उत्पादनाची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे, केमिस्ट आणि सूक्ष्म अणुजीव शास्त्रज्ञांचे योग्यता प्रमाणपत्र ठेवणे, कार्यरत कर्मचार्यांना त्वचा रोग नसल्याचे फिटनेस प्रमाणपत्र ठेवणे, प्रत्येक कंटेनरमधील समाविष्ट उत्पादनाचे घटक नमूद करणे. भारतीय मानक ब्यूरोच्या निकषाची अंमलबजावणी जिल्हय़ात सुरू आहे की नाही, याबाबतची तपासणी करून नोटिस बजावणे सुरू आहे. दहा प्लान्टमध्ये प्रक्रियेला बंदी घातली आहे. संपूर्ण जिल्हय़ातील प्लान्टची तपासणी केली जाणार आहे. - एस.एम. कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला.