अकोला : आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे जावई अक्षत बागडिया (२७) यांच्यासह तीन जण भीषण अपघातात जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी छत्तीसगडमधील रायपूरनजीक अभनपूर गावाजवळ घडली. अपघातातील दोन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छत्तीसगड विधानसभेचे सभापती गौरीशंकर अग्रवाल यांचे नातेवाईक ओमप्रकाश अग्रवाल कामानिमित्त कारने रायपूर येथे आले होते. यावेळी आमदार बाजोरिया यांचे एकुलते एक जावई अक्षत बागडिया तसेच कर्नाटक येथील व्यावसायिक जयदीप व जयराम मखन्ना सोबत होते. काम आटोपून घरी परत येत असताना, दुपारी साडेबारा वाजता अभनपूर गावानजीक अग्रवाल यांची कार व टाटा डिक्स वाहनात जोरदार धडक झाली. या धडकेत अक्षत बागडिया, कर्नाटक येथील जयराम मखन्ना व कार चालक जागीच ठार झाले. तर ओमप्रकाश अग्रवाल व जयदीप गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, आमदार गोपीकिशन बाजोरिया कुटुंबीयांसह रायपूरकडे रवाना झाले.
बाजोरिया यांचे जावई अपघातात ठार
By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST